Fitness: बऱ्याच लोकांच्या आयुष्यात फिटनेस (Fitness) हा महत्तवाचा विषय आहे. अशी मंडळी कोणत्या परिस्थितीत त्यांच्या फिटनेसकडे तिरपा डोळा करत नाहीत. त्यातलीच एक म्हणजे अभिनेत्री 'मंदिरा बेदी'. 'अॅक्टर' (Actor)आणि 'होस्ट' (Host) मंदिरा बेदीला फिट (Fit) राहायला किती आवडतं याबाबत काही नवं सांगण्याची गरज नाही. आपण दिवसागणिक अधिक सुदृढ कसं होऊ, याचाच विचार ती करताना दिसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर वजन केले शेअर
मंदिरा बेदी (Mandira Bedi) ने इंस्टाग्राम (Instagram) वर एक पोस्ट शेयर करत सांगितले की, मला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आहे. मी याआधी माझे वजन कोणासोबतच शेअर (Share) केले नव्हते कारण मला असे वाटायचे की माझे वजन (Weight) खुप जास्त आहे. आता मी स्वत:साठी नवीन नियम तयार केले आहेत. मला परत 51 किलोग्रामचे व्हायचे आहे. हे कधी होईल याची कल्पना नाही पण मी प्रयत्न करेण. मी स्वत:चे वर्काउट व्हिडीओ (Workout Video) दररोज शेअर करेल. तिने पुढे हे देखील सांगितले की, काही दिवसांपुर्वीच माझे वजन 56.5 किलोग्राम होते पण आता मात्र ते 55.2 किलोग्राम आहे. याचा अर्थ माझ्यासाठी हा चांगलाच स्टर्टिंग पॉइंट आहे.


पोस्टला नेटकऱ्यांची पसंती
या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि सोशल मीडियावर तिला फॉलो (Follow) करणाऱ्यांनी खुप प्रेम केले. त्यांच्या पोस्टवर फॉर्मर वी जे  Maria Goretti ने कमेंट करत सांगितले की, तू खुप गोड आणि सुपरफिट दिसत आहेस. तुझ्या फिटनेस  (Fitness) जर्नीसाठी ऑल द बेस्ट (All The Best). आता जे वजन तुझे आहे ते वजन माझे असते तर मी त्यात खुप खुश झाले असते. बऱ्याच जणांनी मंदिरा बेदीच्या (Mandira Bedi) त्या फिटनेस  (Fitness) पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या.