Weight Loss : आंबा खा, वजन घटवा! ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आंब्या खाण्याची योग्य पद्धत
Mango for Weight Loss : उन्हाळा आला की सर्वांचा आवडा आंबा बाजारात आला की तोंडाला पाणी सुटतं. आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. मग ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं की, आंबा खा आणि वजन घटवा. कसं ते जाणून घ्या.
Mango for Weight Loss Tips in Martahi : आजकाल तर मुलगा असो वा मुलगी त्यांना सडपातळ अंगकाठी हवी असते. त्यामुळे वजन वाढलं असेल तर ते कमी करायचं आणि ते नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा, जिम आणि डाएट यावर भर दिला जातो. अनेक वेळा आपले आवडीचे पदार्थ्यांचा इच्छा नसतानाही त्याग करावा लागतो. (Mango for Weight Loss Tips in Martahi Rujuta Diwekar told the right way to eat mangoes)
उन्हाळा आल्या की बाजारात येतो, फळांचा राजा आंबा...आंब्याच नाव घेतलं की भल्याभल्या माणसांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण अनेक आहारात तज्ज्ञांनुसार आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढतं म्हणून आंबा खात नाहीत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, आंबामुळे वजन कमी होतं. त्यामुळे आता या उन्हाळ्यात आंब्याचा आस्वाद मनसोक्त घ्या आणि वजन कमी करा. कसं ते न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर आणि न्यूट्रिशनिस्ट पूजा मखीजा यांनी सांगितलंय.
आंबा खा, वजन घटवा!
आंब्यात फायबर, व्हिटॅमिन सी, कोपर, फोलेट, व्हिटॅमिन ए, ई, बी5, आणि बी6. तसेच, त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज भरपूर प्रमाणात असतं. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर आणि न्यूट्रिशनिस्ट पूजा मखीजा यांनी आंब्या खाऊन वजन कमी करताना काही गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलंय. आंब्याचा सेवन करा पण ते मर्यादित असावे. त्याशिवाय रात्रीच्या जेवणानंतर कधीही आंबा खाऊ नका. यामुळे शरीरात जास्त कॅलरीज जाऊ शकतात. त्यामुळे आंबा नेहमी दुपारच्या जेवनानंतर खावा. अगदी तुम्ही नाश्ताही आंब्याचं सेवन करु शकता.
वजन कमी करण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर आणि न्यूट्रिशनिस्ट पूजा मखीजा सांगतात की, मँगो शेक, स्मूद, किंवा आमरस या स्वरुपात आंब्या आनंद न घेता. तुम्हाला आंबा चिकून खायचा आहे. कारण मँगो शेक, स्मूद, किंवा आमरस यातून तुमच्या शरीरात अतिरिक्त साखर मिळते.
आंबा हा मधुमेह आणि लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी चांगला आहे. त्यात फायबर, अँटीऑक्सिडंट्, आणि फायटोन्यूट्रिएंट्सचे प्रमाण जास्त आहे. जे या लोकांसाठी चांगलं असतं.
दिवसात किती आंबे खाऊ शकतो?
काही लोकांना आंबे इतके आवडतात की ते एका दिवसात 5-6 आंबे फस्त करतात. मात्र आहारतज्ज्ञांनुसार, मधुमेह, लठ्ठ लोकांनी दररोज 2 कप किंवा 350 ग्रॅमपेक्षा कमी आंबा खाल्ल्यास हरकत नाही.100 ग्रॅममध्ये सुमारे 60 कॅलरीज असल्याने संपूर्ण आंब्यामध्ये सुमारे 202 कॅलरीज उपलब्धत असतात. त्यामुळे दिवसातून दोन ते तीन आंबे हे ठीक आहे.
( Disclaimer : वर देण्यात आलेल्या गोष्टी केवळ सामान्य माहिती प्रदान करतात. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. झी 24 तास या गोष्टींची पुष्टी करत नाही. )