मुंबई : उन्हाळा हा ऋतू सगळ्यांनाच त्रासदायक, कंटाळवाणा तसंच नकोसा वाटतो. पण हा ऋतू कसाही असला तरी आंबा प्रेमींसाठी तो नक्कीचं आतुरतेचा विषय असतो. उन्हाळा म्हटलं की, आंबा हे जणू समीकरणचं असतं. आवडत्या फळांमधून एक असलेला आंबा खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंब्यात असलेल्या अनेक पोषक तत्वांमुळे तो अनेक गंभीर आजारांपासुन दूर ठेवण्यास मदत करतो. साधा आंबा खाण्याच्या तुलनेत मॅंगो शेक कुठेही सहज आणि माफक दरात उपलब्ध होत असल्यामुळे ते पिण्याचं प्रमाण लोकांमध्ये जास्त आढळून येते. आंबा खाण्याचे अनेक फायदे असले तरी मॅंगो शेकबद्दलही असं असेलचं, असं मुळीचं नाही. त्याचे अनेक तोटे सुद्धा आहेत.


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, मॅंगो शेकमध्ये दूध आणि आंब्याचे मिश्रण असतं पण या दोन्हींचे स्वरूप एकमेकांपासून विरुद्ध आहे. दूध पचनानंतर गोड बनतं आणि आंबा पचनानंतर आंबट होतो. दूध आणि आंबा या दोन्हींचं पचनानंतरचे परिणाम वेगवेगळे असतात. याचा तुमच्या पचनावर परिणाम होतो आणि शरीरात अतिरिक्त चरबी आणि विषारी पदार्थ निर्माण होऊ शकतात.


जाणून घेऊया मिल्कशेक पिण्याचे तोटे


शरीरातील उष्णता वाढते


आंबा हा गरम असतो. मँगो शेकमुळे थोड्या वेळासाठी थंड जाणवतं परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील उष्णता वाढते.


वजन वाढणं


एका मध्यम आकाराच्या आंब्यात कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आंब्याच्या अधिक सेवनानेमुळे वजन वाढण्याची शक्यता असते.


पोटाचे विकार उद्भवतात


मँगो शेकचे जास्त सेवन केल्याने पचनावर परिणाम होतो. यासोबतच उलट्या, जुलाब, मळमळ यांसारख्या समस्याही होऊ शकतात.


रक्तातील साखर वाढू शकते


आंबा खूप गोड असतो ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. मधुमेह आणि प्रि-डायबेटीज असलेल्यांनी मँगो शेक पिणं टाळावं.


त्वचेची ऍलर्जी होऊ शकते


दूध आणि आंब्याच्या मिश्रणामुळे काही लोकांना त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. त्यांना त्वचेवर खाज सुटणं, रॅशेस होणं हे त्रास सुद्धा उद्भवू शकतात.