मुंबई : जगातून अजूनही कोरोना व्हायरसचा धोका संपुष्टात आलेला नाही. अनेक देशांमध्ये प्रकरणं वाढताना दिसतायत. त्यासोबतच व्हायरसचे नवीन व्हेरिएंटही समोर येताना आहेत. कोरोना अजून संपण्याचं नाव घेत नाही याच दरम्यान एक नवीन व्हायरस समोर आला आहे. जो खूप खूप धोकादायक आहे आणि या व्हायरसचे नाव मारबर्ग आहे. मारबर्ग व्हायरस हा सर्वात धोकादायक व्हायरस मानला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकी देश घानामध्ये मारबर्ग व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. या व्हायरसची प्रकरणं समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्वांना अलर्ट केलं आहे. असं मानलं जातं की, जो कोणी या व्हायरसच्या तावडीत येईल, त्याचा मृत्यू जवळपास निश्चित आहे.


या व्हायरसने आधीच कहर केला आहे. 1967 मध्ये या व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळले. हा व्हायरस धोकादायक असून त्याचा प्रसार वेगाने होतो. संसर्ग झालेल्यांचा मृत्यू दर 24 टक्क्यांपासून ते 88 टक्क्यांपर्यंत आहे.


जनावरांना देखील याचा धोका


आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मारबर्ग व्हायरस इबोला आणि कोरोना सारखाच आहे, जो माणसांबरोबरच प्राण्यांमध्येही पसरू शकतो. कोरोना व्हायरसप्रमाणेच मारबर्गचा वाहक वटवाघुळ आहे. या प्राणघातक व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका 24 ते 88 टक्क्यांपर्यंत असतो. हा धोकादायक विषाणू यापूर्वी दक्षिण आफ्रिका, अंगोला, केनिया, युगांडा आणि काँगो प्रजासत्ताक येथे आढळून आला आहे.


या व्हायरसबाबत वर्णन करताना, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) माजी महासंचालक एन.के. गांगुली म्हणाले की, मारबर्ग व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. त्याची लक्षणे फ्लूसारखीच असतात. यासाठी कोणतंही अँटीव्हायरल औषध किंवा लस नाही.