`ग्लॅमरच्या जगात फक्त दिसणंच नाही तर...` मयुरी देशमुख Mental Health साठी करते `या` गोष्टी
Mayuri Deshmukh on Mental Health : अभिनेत्री मयुरी देशमुख अतिशय संवेदनशील अभिनेत्री आहे. स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी करते खास प्रयत्न. ज्याची प्रत्येकालाच होईल मदत.
मराठीसोबतच आता हिंदी छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मयुरी देशमुख. अभिनेत्री मयुरी देशमुख ही कायमच आपल्या वेगळ्या अभिनयामुळे ओळखली जाते. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख नवा सिनेमा घेऊन येत आहे. या दरम्यान एका मुलाखतीत मयुरी देशमुखने मानसिक आरोग्याबद्दल बोलली आहे. मयुरी देशमुख स्वतःच मानसिक आरोग्य कसं सांभाळतं?
मयुरी देशमुख म्हणते की,'जिम, डाएट, कपडे... कशावर मेहनत घेते याकडे माझं अधिक लक्ष असतं. पण फक्त आऊटर बॉडीकडे लक्ष देते का तर अजिबात नाही. मयुरी देशमुख आपल्या मेंदू आणि मनाकडेही तितकंच लक्ष देते. या दोन गोष्टींकडे कमी लक्ष जातंय का? याकडे विशेष लक्ष असतं.
मानसिक आरोग्य महत्त्वाचं
मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं असल्याचं मयुरी सांगत बऱ्याच गोष्टी करते. मानसिक आजार असो किंवा नसो तरीही त्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आताच जग खूप स्पर्धेचं झालंय. नातेसंबंधात गुरफटलेलं आहे. अशावेळी कोणत्याही गोष्टींनी लगेच मन उत्तेजित होतं, मनावर दडपण येतं. आपला मेंदू सारखा कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार करत राहतोय आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडतं आहे ज्याचा परिणाम मनावर आणि मेंदूवर होत असते. मयुरी म्हणते रंगांचंच बघा ना? या अगोदर आपल्या आजूबाजूला इतके रंग नव्हते. आता आपल्या डोळ्यांना किती रंग दिसत आहेत.
सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टींचा मनावर परिणाम
दिवसातून चार वेळा आपण युट्यूब बघू शकतो. अगदी रात्री झोपताना कोणताही सिनेमा बघू शकतो. आधी हे असं नव्हतं. खाण्यामध्ये इतक्या गोष्टी आल्या आहेत. अगदी दोन मिनिटांत मॅगी होते तर काही मिनिटांत स्विगी, झोमॅटोवरुन सहज जेवण उपलब्ध होतात. या सगळ्याच गोष्टी तुमच्या मेंदू आणि मनावर कळत नकळत परिणाम करत असतात, असं मयुरी सांगते.
सोशल मीडिया
इन्स्टंट ग्राफीटिकेशन म्हणजे आता प्रत्येकाला तात्काळ समाधान हवं असतं. पटकनं गुंतायला इतकी आजूबाजूला साधनं आली आहेत की आपण आपला मेंदू आणि मन हे वेळेच्या आधी जास्त थकवलं आहे. हे सगळ्यांचच झालं आहे. यावर उपाय म्हणून मयुरी खालील गोष्टी करते.
सोशल मीडियाचा कमी वापर करणे
शारिरीक मानसिक आरोग्य महत्त्वाचं
इंटिग्रेटेड अप्रोच महत्त्वाचा
चांगल खाणं
चांगल कॉन्टेन्ट पाहणं
योगा
जिम
चांगल वाचन
मेडिटेशन
योगा
प्राणायाम
ब्रिथ वर्क
नाही बोलायला शिका
नको त्या लोकांना नकार द्यायचा
ज्या लोकांकडून नकारात्मक विचार मिळतात त्यांना टाळा
टाळणं देखील अतिशय महत्त्वाचं
घाई करु नका