मुंबई : आता गोवरबाबत (Measles) एक चिंताजनक बातमी. राज्यात गोवरचा प्रसार वेगानं वाढतोय. कोरोनापेक्षा (Corona) पाच पट वेगानं गोवर पसरतोय असा दावा तज्ज्ञांनी केलाय. त्यामुळे पालकवर्गाची चिंता वाढलीय. गोवरचा प्रसार अतिशय वेगानं होतोय. मुंबईसह संपूर्ण राज्यात गोवरच्या रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना गोवरचा सर्वाधिक धोका आहे. तज्ज्ञांनी गोवरच्या प्रसाराची तुलना थेट कोरोनाशी केलीय. दोन वेळा धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनापेक्षा गोवरच्या प्रसाराचा वेग पाचपट अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. (measles mumbai bmc do not igonarance to vaccination health news)


पाचपट वेगानं पसरतोय गोवर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोगाच्या प्रसाराचा वेग हा आर नॉट या एककाच्या माध्यमातून मोजला जातो. एका रुग्णाकडून किती व्यक्तीना विषाणूची लागण होते, यावरून प्रसाराचा हा वेग ठरवला जातो. गोवरची लागण ही एका रुग्णाकडून साधारणपणे 12 ते 14 जणांना होत आहे. त्या तुलनेत करोनाची एका रुग्णाकडून तीन ते चार जणांनाच लागण होत होती. त्यामुळे कोरोनापेक्षा गोवरचा प्रसाराचा वेग अधिक आहे. तर गोवरचा वेगाने प्रसार होत असल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी फेटाळून लावलाय. 


गोवरमुळे आतापर्यंत 15 बालकांचा मृत्यू झालाय. अर्थात गोवरला रोखण्यासाठी आपल्याकडे लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. त्यामुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष करू नका. लसकरणाकडे पाठ म्हणजे मृत्यूशी गाठ हे पक्कं ध्यानात ठेवा..तुमची सजगताच कोरोनाप्रमाणे गोवरलाही आळा घालू शकेल.