चीनमध्ये १४ कोटी पुरूष नपुंसक असल्याचा एका कंपनीचा दावा
चीनमध्ये १४ कोटी पुरूष नपुसंक असल्याचा दावा वियाग्रासारखे औषध बनविणाऱ्या एका कंपनीने केलाय.
बीजिंग : चीनमध्ये १४ कोटी पुरूष नपुसंक असल्याचा दावा वियाग्रासारखे औषध बनविणाऱ्या एका कंपनीने केलाय. या रिपोर्टनंतर कंपनीच्या शेयर्सने वेगाने उसळी घेतली आहे.हॉंगकॉंगमधील दैनिक साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका वृत्तानुसार, बुधवारी हेबेई चांगशान बायोकेमिकल फार्मास्यूटिकलचे शेनझेन शेयर्सनी बाजारात १० टक्के अधिक उसळी घेतली. कंपनीचे शेयर्स आजही मजबूत झाले. 'द बीजींग न्यूज'चा हवाला देत साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने म्हटले, दक्षिणी जियांग्सु प्रांतातील ईकाईच्या घोषणेनुसार त्यांना सिल्डेनाफिल साइट्रेट टॅबलेटच्या उत्पादनास मंजुरी देण्यात आली आहे. या रसायनाचा उपयोग वियाग्रामध्ये केला जातो जो मुख्यत्वे नपुंसकत्वाचे निराकरण करण्याच्या मार्गी असतात. जर ३० टक्के नपुंसक लोकांनी याचा उपयोग केला तर चीनमध्ये याच अरबो युआनच मार्केटच असल्याचही सांगण्यात येतय.