मुंबई : महिला आपल्या प्रत्येक गोष्टी पुरूषांसोबत शेअर करत असतात. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पुरूषांनाही सांगायच्या असतात. त्या गोष्टी न सांगताच महिलांना कळाव्यात असं त्यांना वाटतं. त्यामुळे आपल्या पुरूष पार्टनरच्या काही गोष्टी महिलांना न सांगताच कळायला हव्या.


सन्मान द्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मैत्रिणीने आपला सन्मान करावा असं प्रत्येक पुरूषाला वाटतं. दोघांनी एकमेकांचा सन्मान केला तर नातं अधिक दृढ होतं आणि नात्यात कटुता येत नाही.


प्रशंसा करा 


आपली प्रशंसा करणारा मित्र असावा अशी महिलांची इच्छा असते पण त्याचप्रमाणे आपली प्रशंसा करणारी मैत्रिण असावी अशी पुरूषांचीही इच्छा असते. एकदा त्याची तारीफ करुन बघाच तो तुमचाही चांगला प्रशंसक बनून जाईल.


प्रत्येक ठिकाणी सोबत 


पुरूष प्रत्येक ठिकाणी  जाताना महिलेलासोबत घेऊन जात नाहीत पण अशी खूप ठिकाणं आहेत जिथे त्यांना तिची गरज असते. सकाळी जॉगिंग, विकेंड, पार्टीला तिला सोबत नेताना त्यांना आनंद होतो.


थोडा श्रृंगार 


तुम्ही भलेही मॉडेल नसाल पण तुमच्या पुरूष मित्रासाठी थोडासा श्रृंगार नक्की करु शकता. तुम्हाला पार्लरमध्ये तासनतास घालवणं आवडत नसलं तरीही तुमच्या पार्टनरसाठी थोडासा मेकअप तरी करुन जायला हवं. त्याला नक्की आवडेल.


गप्पा मारा 


दिवसभराचं काम, ताण तणावर यातून बाहेर पडण्यासाठी चांगले शब्द कानावर पडावेत अशी त्याची इच्छा असते. तुमच्या प्रेमाचे शब्द ऐकून त्याचा थकवा दूर होतो. त्यामुळे आपल्या पुरूष मित्रासोबत गोड वाणीचा उपयोग करा.


प्रोत्साहित करा 


यशाच्या प्रत्येक पावलावर त्याला तुमची साथ मिळते. हे कायम ठेवा. जर कधी तो अपयशी झाला तर त्याला प्रोत्साहित करणं तुमचं काम आहे. तुमच्या प्रोत्सहान देण्याने त्याला अधिक बळ मिळतं.


इच्छा माना 


आपल्या पुरूष मित्राने कोणता निर्णय घेतला असल्यास त्याच्या पाठिशी उभं राहा. त्या निर्णयात काही कमी असेल ती सुधारण्यास मदत करा. आपल्या इच्छांचा सन्मान करावा हेच त्याला हवं असतं.


स्वातंत्र्य द्या 


आपल्या पार्टनरने आपल्याकडून प्रत्येक मिनिटाचा लेखाजोखा मागू नये. प्रत्येक क्षणाचा हिशोब देण्यासाठी खोट बोलावं लागून त्यामुळे नात्यात कटुता येऊ नये याची काळजी घ्यायला हवी.