World Milk Day 2023 in marathi : 'दुध.. दुध...दुध..पियो ग्लासभर' ही अमोलची जाहिरात आजही टीव्हीवर दाखविण्यात येते. दूध हा एक जीवनावश्यक घटक आहे. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी दूध गरजेचं आहे. दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण ते योग्य पद्धतीने पिणं गरजेचं आहे. अनेकांना दूध (milk) प्यायल्यानंतर पोट फुगलेलं वाटतं, गॅसचा त्रास  (Gas trouble) होतो.  मग तु्म्ही दूध पिताना चूक करत आहात का? (Health Tips)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांची सकाळ तर अनेकांची रात्र ही दूध घेतल्याशिवाय होतं नाही. काही लोकांना थंड दूध प्यायला आवडतं तर काही लोकांना गरमच दूध लागतं. पण गरम किंवा थंड दूध कधी प्यावे? दुधाचे कसं सेवन केल्यास जास्त फायदा होईल. (Milk Drinking Benefits)


आज  World Milk Day 2023 आहे त्यानिमित्ताने आज आपण दूध पिण्याची योग्य पद्धत, गरम थंड दूधाबद्दल जाणून घेणार आहे.  (Milk Benefits)


दूध पिण्याची योग्य पद्धत


बहुताश: लोकांना हे माहिती आहे की, पाणी कायम बसून प्यावी. तुम्हाला हे माहिती आहे का की दूध पिण्याचीही पण एक पद्धत आहे ते. तुम्हाला जे जाणून आश्चर्य वाटेल की, दूध हे कायम उभ राहून प्यावे. दुधामुळे शरीराला थंडावा, वात आणि पित्त दोष कमी करण्यास मदत होते, असं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे. दूध हे पचनास जड असतं त्यामुळे दूध कायम उभ राहून प्यावे. तर संध्याकाळच्या जेवणानंतर दोन तासांनी आणि झोपण्यापूर्वी दोन तासांनी कोमट दूध पिण्याचा सल्ला आयुर्वेदात देण्यात आला आहे. 


उभं राहून दूध पिण्याचे फायदे 


उभं राहून दूध प्यायल्याने गुडघ्यांचा त्रास कमी होतो. त्याशिवाय स्नायू बळकट होतात. कर्करोगाचा धोका कमी होतो, असं तज्ज्ञ सांगतात. हृदयविकार (Heart disease) आणि उच्च रक्तदाबापासूनही (High blood pressure) तुम्ही दूर राहता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उभं राहून दूध प्यायल्यास तुमच्या डोळ्यांना आणि त्वचेला फायदा मिळतो. 


थंड आणि गरम दूध कधी प्यावे? (Hot Milk Or Cold Milk)


तज्ज्ञ आणि आयुर्वेदानुसार थंड दूध सकाळी आणि गरम दूध रात्री प्यावे. आता पण थंड दुधाचे आणि गरम दुधाचे फायदे जाणून घेऊयात.


गरम दूध पिण्याचे फायदे 


निद्रानाश ही समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वीच गरम दूध प्यावे. 


गरम दूध पचण्यास हलके असते. त्यामुळे गरम दूध घेतल्याने पचनक्रिया सुधारते. 


शरीरावर येणारी सूज आणि अतिसार या समस्या दूर राहते. 


गरम दूध प्यायलामुळे शरीराचं आर्द्रतेपासून संरक्षण होतं. 


थंडीच्या दिवसात चहा किंवा कॉफीचे सेवन गरम दूध फायद्याचं असतं. 


गरम दुधामध्ये काही नैसर्गिक पदार्थ (natural ingredients) मिक्स करुन प्यायल्यास तुम्हाला अनेक फायदे दिसून येतात. 


गरम दुधामध्ये लॅक्टियम नावाच्या प्रोटिन असतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. 


गरम दुधाचे सेवन केल्यामुळे स्नायूंचा ताण आणि तणावग्रस्त नसा मोकळ्या होतात. 


गरम दूध खास करुन हळदीचं गरम दूध प्यायल्याने बॅक्टेरियापासून बचाव होतो. 


थंड दूध पिण्याचे फायदे 


वजन कमी करायचे असेल तर थंड दूध प्या.


थंड दूध प्यायल्यामुळे तुम्हाला एसिडीचा त्रास कमी करण्यास फायदा होणार आहे. 


त्वचेचा टोनिंगसाठी थंड दूध फायदेशीर आहे. 


थंड दूध त्वचेवर एखाद्या क्लिनजरचं काम करतं. 


दिवसभर तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी थंड दूध चांगल आहे. 


सकाळी एक ग्लास थंड दुधाचं सेवन केल्यास दिवसभर शारीरिक उर्जा मिळते. 


प्रत्येकाचं शरीर आणि ऋतूनुसार थंड किंवा गरम दुधाचं सेवन कराला हवं. तरीदेखील डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ही गोष्ट करा. 



'या' गोष्टीदेखील लक्षात ठेवा!


1. लहान मुलांना आंघोळीनंतरच दूध प्यायला द्यावे.


3.दूधासोबत कोणतेही आंबट फळ मिक्स करुन मिल्कशेक बनवू नयेत. संत्र, पपई, स्ट्रॉबेरीचं दूधासोबत सेवन टाळा. अन्यथा तुम्हाला पोटाचा विकार होण्याची भीती आहे. 


4. खोकला, सर्दी, कफाचा त्रास असल्यास थंड दूध पिणं टाळा. 


5. दुधात गूळ मिसळून पिण्याचे जादुई फायदे आहेत. 


6. दूधात सुंठ मिसळून घेतल्यास पचनाची समस्या दूर होते. 


8. संध्याकाळच्या वेळेस मुलं खेळून आल्यानंतर अभ्यासाला बसण्यापूर्वी त्यांना ग्लासभर दूध आरोग्यास फायदेशीर ठरतं 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)