मुंबई : मधुमेहाचं निदान झालं की प्रामुख्याने खाण्या-पिण्यावर बंधन येतात. आहराचं गणित सांभाळलं नाही तर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते. मात्र ठराविक वेळेच्या अंतराने काही  खाल्ले गेले नाही तरीही त्रास होऊ शकतो. सामान्य लोकांप्रमाणेच मधुमेहींच्या आहारातही योग्य नाश्ता गरजेचा आहे. अनेकदा घाईगडबडीत सकाळी बाहेर पडावं लागत असल्याने अनेकजण नाश्ता टाळतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुमेहींसाठी सकाळी नाश्ताला आहारात दूधाचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.  


मधुमेहींसाठी दूध फायदेशीर  


कॅनडा युनिव्हर्सिटी ऑफ ग्वेल्फ आणी युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या एका अभ्यासानुसार नाश्तामध्ये चांगल्या प्रतीच्या प्रोटीनयुक्त दूधाचा समावेश केल्याने मधुमेहींना फायदा होऊ शकतो. या प्रकाशित अहवालानुसार, नाश्त्यामध्ये बदल केल्याने टाईप 2 डाएबिटीजचा त्रासही आटोक्यात ठेवला जाऊ शकतो.  


दूधाचा फायदा 


नाश्तामध्ये दूधाचा समावेश केल्याने रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 


जर्नल ऑफ डेअरी सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार योग्य वेळी दूधाचं सेवन केल्याने त्याचा आरोग्याला फायदा होतो. यामुळे कार्बोहायड्रेटचं पचन हळूहळू होण्यास मदत होते. परिणामी रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.