मुंबई : Wrong Milk Combination: तुम्हाला तुमच्या लहानपणी काही खास गोष्टी आठवत असतील. जेव्हा तुम्ही दूध पिण्यास नकार द्यायचे तेव्हा आई तुम्हाला प्रेमाने दूध द्यायची किंवा कधी कधी धपाटा घालून ग्लासभर दूध प्यायला लावायची. कारण लहान मुले असो वा वडीलधारी, दूध हे सर्वांसाठीच फायदेशीर असते. दुधाचे नियमित सेवन केल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुधामध्ये कॅल्शियम  (Calcium), पोटॅशियम (Potassium), प्रथिने (Protein) आणि फॉस्फरस (Phosphorus) इत्यादी अनेक पोषक घटक असतात. हे सर्व घटक आपल्या शरीरात हाडे मजबूत करण्यापासून इतर समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत. पण दुधामुळे शरीराला फायद्यांसोबतच हानीही होऊ शकते. जाणून घेऊया दुधाचे फायदे आणि तोटे. तसेच दुधासोबत कोणत्या वस्तूंचे सेवन करु नये. 


दुधाचे पिण्याचे फायदे


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दूध पिण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात. स्नायूंसाठी फायदेशीर असते. याशिवाय, हृदयाशी संबंधित समस्या कमी करते आणि ग्लूकोज नियंत्रित करते. वास्तविक, दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, पेप्टाइड्स आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात, जे स्नायू आणि हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहे. यासोबतच म्हातारपणी होणार्‍या ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चरपासून संरक्षण करण्यास दूध मदत करते. 


यासोबत दूध घेऊ नका


अनेकदा तुम्ही घरातील वडिलधार्‍यांचे म्हणणे ऐकले असेल की, या वस्तूसोबत दुधानंतर किंवा आधी खाऊ नका. काही वस्तू खल्ल्यानंतर किंवा गोष्टींचे सेवन केल्यानंतर दूध पिऊ नये. तुम्ही लक्षात ठेवा की दूध पिण्याआधी मीठाने बनवलेल्या गोष्टी कधीही खाऊ नयेत. असे केल्याने तुमच्या पोटाला इजा होऊ शकते. उडीद डाळ आणि आंबट पदार्थ खाल्ल्यानंतरही दूध पिणे टाळावे. दूध प्यायल्यानंतर विसरुनही मासे खाऊ नयेत. असे केल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. असे केल्याने अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते, असे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. याशिवाय दही खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये कारण दुधाचे पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)