खाण-पिणं नव्हे तर मोबाईलमुळे होऊ शकतात पिंपल्स
सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीराचे मोठे नुकसान होतेय. घर, ऑफिसमधील कामाच्या गराड्यात अडकल्यामुळे स्वत:कडे पुरेसा वेळ दिलाच जात नाही. याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. चेहऱ्यावर पिंपल्स तसेच डाग येतात. केवळ खाण्यापिण्याच्या सवयीमुळेच नव्हे तर मोबाईलही पिंपल्स येण्याला कारणीभूत ठरु शकतो.
मुंबई : सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीराचे मोठे नुकसान होतेय. घर, ऑफिसमधील कामाच्या गराड्यात अडकल्यामुळे स्वत:कडे पुरेसा वेळ दिलाच जात नाही. याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. चेहऱ्यावर पिंपल्स तसेच डाग येतात. केवळ खाण्यापिण्याच्या सवयीमुळेच नव्हे तर मोबाईलही पिंपल्स येण्याला कारणीभूत ठरु शकतो.
मोबाईलमुळे पिंपल्स
सध्याच्या युवा पिढीमध्ये मोबाईलची क्रेझ इतकी आहे की मोबाईलशिवाय ते राहू शकत नाही. रात्री झोपण्याआधी ते सकाळी उठल्याबरोबर पहिले काम असते ते मोबाईल बघणे. एका रिसर्चनुसार मोबाईलच्या अति वापराने पिंपल्सची समस्या वाढते. जेव्हा आपण रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलत असतो तेव्हा स्किनमध्ये अनेक बॅक्टेरिया घुसतात. ज्यामुळे पिंपल्स वाढतात.
तेलकट त्वचा
तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. अनेकदा जंक फूड, शरीरात होणारे हार्मोनल बदल यामुळेही पिंपल्स येतात.
मानसिक ताण
सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये लोक इतके बिझी झालेत की ते सतत कोणत्या ना कोणत्या ताणाखाली असतात. पिंपल्स येण्यामागे तणाव हेही कारण असू शकते.
ब्युटी प्रॉडक्ट्स
अनेकदा चांगले दिसण्यासाठी केमिकलयुक्त ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. मात्र हे प्रॉडक्ट्स आपल्या चेहऱ्याला सूट होतील की नाही याची खातरजमा केली नाही. याचा परिणाम पिंपल्सवर होतो.