मुंबई : सध्या बॉलिवूड विश्वात अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या जोडीची चर्चा सुरु आहे. आलिया आणि रणबीर लवकरच आई-बाबा होणार आहेत. आलिया तिच्या प्रेग्नंसीमुळे आणि गरोदर असतानाही करत असलेल्या कामामुळे खूपच चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या फोटोंमुळेही अनेकांच्याच नजरा आलियावर खिळत आहेत. गरोदरपणाती नूर वगैरे सर्वकाही ठीक, पण आलियाची त्वचा इतकी चमकदार दिसत आहे, की पाहणाऱ्यांना तिच्या या नितळ त्वचेचं गुपित जाणून घेण्यात बरीच उत्सुकता आहे.


तुम्हालाही गरोदरपणात अशीच चमक मिळवायची असेल, तर या सोप्या टिप्स नक्कीच मदत करतील.


बहुतेक महिलांना त्यांची त्वचा गरोदरपणाच्या (Skin pregnancy) पहिल्या तिमाहीत खूप निस्तेज होतेय असं वाटतं. हार्मोनल बदलांमुळे त्यांची त्वचा देखील खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री आपली प्रेग्नेंसी ग्लो टिकवण्यासाठी (maintain the pregnancy glow) काय करतात हा मोठा प्रश्न.


गर्भधारणेदरम्यान, स्त्रीला तिच्या त्वचेची किंवा सौंदर्याची जास्त काळजी घेता येत नाही. कारण तिचे संपूर्ण लक्ष तिच्या मुलाकडे आणि तिच्या आरोग्याकडे असते. या काळात महिलांच्या शरीरासोबतच त्यांच्या केसांवर आणि चेहऱ्यावरही अनेक बदल होतात. त्यामुळे त्या खूप निराश होतात. अशा परिस्थितीत आलियाप्रमाणे तुम्हीही चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी काही उपाय करू शकता.


शरीरात पाण्याची कमतरता
शरीरात पाण्याची कमतरता भासू नये, जमेल तेवढे पाणी प्या. यामुळे त्वचेची चमक कधीच कमी होणार नाही. तुमची त्वचा देखील हायड्रेटेड (hydrated) राहील. त्वचा निरोगी असेल तर तुम्हीही निरोगी असाल.


शीट मास्क वापरा
गरोदरपणात त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही शीट मास्क (sheet mask)  वापरू शकता. आलिया भट्ट तिची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी शीट मास्क देखील वापरते आणि कधीकधी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करते.



त्वचा चमकदार बनवू  
जर तुम्हाला गरोदरपणात बाहेरची कोणतीही उत्पादने वापरायची नसतील. तर तुम्ही घरगुती पद्धतींनीही त्वचा चमकदार बनवू शकता. मध, कोरफड, हळद, बेसन आणि गुलाबपाणी अशा अनेक घरगुती गोष्टी आहेत.  ज्याच्या मदतीने तुम्ही त्वचा चमकदार ठेवू शकता.


आहाराचीही विशेष काळजी
आलिया तिच्या डाएटची खूप काळजी घेते. आहाराचीही विशेष काळजी घ्यावी लागेल. जसे तुम्ही नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी काय खात आहात.


जर तुमच्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर मुरुमं किंवा इतर कोणतीही समस्या जास्त दिसू लागली तर तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. अशावेळी घपगुती कोणतेही उपाय करू नका.