मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसनंतर आता अजून एका व्हायरल आजाराने चिंता वाढवली आहे. ब्रिटननंतर आता अमेरिकेतही मंकीपॉक्सचं प्रकरण समोर आलंय. अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा संसर्ग झाल्याची खात्री करण्यात आली. हा व्यक्ती नुकताच कॅनडाहून परतला होता.


अमेरिकेत सापडलं मंकीपॉक्सचं प्रकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅसॅच्युसेट्स विभागाने एका जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलंय की, या व्यक्तीची सुरुवातीला जमैकाच्या लॅबमध्ये चाचणी करण्यात आली होती. यानंतर यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनमध्ये व्हायरसची खात्री पटली. या व्यक्तीची परिस्थिती ठीक असून तो रुग्णालयात दाखल आहे.


काय आहे मंकीपॉक्स?


मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ आणि गंभीर व्हायरल संसर्ग आहे जो सामान्यतः फ्लू सारखा आजार आणि लिम्फ नोड्सच्या सूजमुळे सुरू होतो. यामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर पुरळ येते. या व्हायरसचं संक्रमण 2 ते 4 आठवडे टिकून राहण्याची शक्यता आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, हा विषाणू लोकांमध्ये सहजपणे पसरत नाही. मात्र रुग्णाच्या शरीरातील द्रवपदार्थांच्या संपर्कातून आणि मंकीपॉक्सच्या जखमांमुळे पसरण्याची शक्यता आहे.


ब्रिटनमध्ये 9 प्रकरणांची नोंद


मे 2022 च्या सुरुवातीला यूकेमध्ये मंकीपॉक्सची 9 प्रकरणं आढळून आली आहेत. नायजेरियामध्ये पहिलं प्रकरणं समोर आलं होतं.