अधिक तास काम केल्याने Heart Attackचा वाढतो धोका; WHOचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच एक अहवाल जारी केला आहे.
मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. यामध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांच्या चिेंतेत भर घातली आहे. या अहवालानुसार, दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्तीना हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही गंभीर आजारांमुळे जगभरात अनेक मृत्यू होतात.
एनवायरनमेंट इंटरनेशनलमध्ये छापण्यात आलेला डब्ल्यूएचओ आणि इंटरनेशनल लेबर ऑर्गनाइजेशनच्या अभ्यासानुसार, 2016 मध्ये दीर्घकाळ काम केल्याने स्ट्रोक आणि हृदयाच्या आजारांमुळे 7,45,000 लोकांचा मृत्यू झाला. 2000 नंतर या संख्येमध्ये 29 टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं.
अहवालानुसार, आठवड्यामध्ये कमीतकमी 55 तास काम करण्याचा परिणाम वर्ष 2016 मध्ये 3,98,000 लोकांचा स्ट्रोकमुळे आणि 3,47,000 लोकांचा हार्ट अटॅकचा मृत्यू झाला.
पुरुषांवर होतोय सर्वात जास्त परिणाम
वर्ष 2000 आणि 2016 या दरम्यान, दीर्घकाळ काम केल्यामुळे हृदयरोगाच्या आजाराने मृत्यू होण्याची संख्या 42 टक्के आणि स्ट्रोकमुळे मृत्यूंची संख्या 19 टक्के होती. या अहवालानुसार याचा परिणाम सर्वाधिक पुरुषांवर होत आहे. त्याचप्रमाणे 45 ते 74 वयोगटातील जे पुरुष प्रत्येक आठवड्याला 55 तासांपेक्षा अधिक काम करत होते त्यांच्या मृत्यूचा आकडा 72 टक्के नोंदवण्यात आला.
कोरोना महामारी गेल्या काही महिन्यांपासून बहुतेक लोकं वर्क फ्रॉम होम करत आहेत. घरातूनच काम केल्यामुळे केवळ लोकांच्या स्क्रीनची वेळच वाढली नाही तर कामाचा ताणही वाढला आहे. त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होताना दिसला.
वर्क फ्रॉम होमसोबतच धुम्रपान, अपुरी झोपयासारख्या समस्या देखील वाढतात. काही लोक नैराश्यालाही बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, लोकांना कामाच्या बाहेर थोडा वेळ काढून स्वत: वर लक्ष केंद्रित करणं आणि निरोगी जीवनशैलीसाठी योग करणं महत्वाचं आहे.