मुंबई : मॉर्निग वॉक आरोग्यास फायदेशीर असला तरी थंडीच्या दिवसात सकाळी वॉक घेताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.


योग्य कपडे वापरा :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण योग्य कपडे न घातल्यास चालताना त्रास होऊ शकतो. थंडीचे खूप ऊबदार कपडे घालणे टाळा. कारण तुमच्या शरीराचे तापमान वाढल्यास तुम्ही अधिक मेहनत घेऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे सुती कपडे घालू नका. त्यामुळे तुम्हाला थंडी वाजेल. म्हणून पातळ थर्मल घालणे योग्य ठरले. 


हायड्रेट रहा :


थंडीत जास्त पाणी पिण्याची गरज नाही, असे अनेकांना वाटते. पण ते चुकीचे आहे. म्हणून मॉर्निग वॉकला जातना पाण्याची छोटी बॉटल सोबत ठेवा.


सनस्क्रीन लावा :


कमीत कमी 15 एसपीएफ असलेले सनस्क्रीन लावा. उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.


अधिक व्यायाम टाळा :


सुरूवातीला अधिक व्यायाम करणे टाळा. जर तुम्ही आताच व्यायामाला किंवा वॉलला सुरूवात केली असेल तर त्याच्या अतिरेकामुळे नुकसान होऊ शकते. म्हणून हळूहळू तुमची गती वाढवा आणि व्यायाम करा.


योग्य ते खा :


वॉकला सुरूवात करण्याआधी एक केळ किंवा एक सफरचंद यांसारखे हलके पदार्थ खा. कारण रात्रभर काहीच खाल्लेले नसल्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सकाळी कमजोर किंवा चक्कर आल्यासारखे वाटू शकते. म्हणून हलके काहीतरी खाणे गरजेचे आहे.