मुंबई : वाढतं वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. वाढत वजन वेळीच नियंत्रणात आणलं नाही तर अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. तसेच याचा निरोगी आरोग्यावर देखील परिणाम दिसून येते. म्हणूनच वेळीच वजन कमी करणं महत्त्वाचं आहे. वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोकं वेगवेगळे मार्ग निवडतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयपूरमध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय मेघा सोनी यांनी देखील वाढतं वजन कमी करायचं ठरवलं. मेघा यांचं वजन 85 किलो होतं. जेव्हा त्यांच्या मुलाने त्यांना वजनाबाबत टोकलं तेव्हा त्यांनी वजन कमी करण्याचा ठाम निश्चय केला. 
फास्ट फूड खाणं पूर्णपणे बंद केलं आणि पावर योगा करायला सुरुवात केली.18 महिन्यांमध्ये मेघा यांनी तब्बल 27 किलो वजन कमी केलं. आणि आता त्या पतीला देखील वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहीत करत आहे.


मेघा सोनी यांचा डायट प्लॅन


- नाश्ता - ओट्सबरोबर सुका मेवा
- दुपारचं जेवण - १ चपाती, १ वाटी भाजी आणि दही
-रात्रीचं जेवण - सलाड आणि प्रोटिन शेक
- प्री-वर्कआउट मिल - ब्लॅक कॉफी
- पोस्ट-वर्कआउट मिल - फळं
- याव्यतिरिक्त चीट डे दिवशी आइस्क्रीम किंवा केक


मेघा म्हणतात, माझं वजन बरंच वाढत होतं. यामुळे मी खूप त्रस्त झाले होते. एकदा माझा मुलगा टिव्ही पाहत असताना त्याने मला एक प्रश्न विचारला आणि मी गोंधळूनच गेले. सिनेमांमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री आणि मॉडेल इतक्या फिट आहेत, मग तु का नाही?. त्याचा हा प्रश्न ऐकून वजन कमी करण्याचा मी निश्चय केला. 


वजन कमी करण्यासाठी मेघाच्या मुलाचा एक प्रश्न तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. मेघाने वजन कमी करत असताना तिचं डाएट काटेकोरपणे पाळलं. तसेच डाएटच्या जोडीला व्यायाम देखील केला.