मुंबई : मध्यप्रदेशाच्या भोपाळमध्ये डेंटल सर्जनचा हलगर्जीपणा एका व्यक्तीला फार महागात पडलं आहे. डॉक्टर, डेंटल इम्प्लांट करताना त्यांच्या हातून स्क्रू घसरला आणि तो रूग्णाच्या फुफ्फुसांमध्ये जाऊन अडकला. यानंतर शस्त्रक्रिया करून तो स्क्रू काढून टाकण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोपाळमधील एका खाजगी क्लिनिकमधील ही घटना आहे. या डेंटल क्लिनिकमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती डेंटल इम्लांट करण्यासाठी आला होता. इम्लांटची प्रक्रिया सुरु असताना डॉक्टरच्या हातून स्क्रू निसटला. आणि गळ्यावाटे हा स्क्रू त्या व्यक्तीच्या फुफ्फुसांमध्ये जाऊन पोहोचला. डेंटल इम्लांटच्या प्रक्रियेमध्ये लहान आकाराचे स्क्रू वापरले जातात.



फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर या व्यक्तीला सतत खोकल्याचा त्रास होऊ लागला. शिवाय त्याला छातीत दुखण्याचीही समस्या जाणवू लागली. त्रास अधिक वाढल्यानंतर गांधी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाला. या रूग्णालया पल्मोनोलॉजीस्ट डॉ. पराग शर्मा यांनी शस्त्रक्रिया करत फुप्फुसांमध्ये अडकलेला हा स्क्रू बाहेर काढला आहे.


डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, ही फार जटील शस्त्रक्रिया होती. रूग्णाला अॅनेस्थेशिया देण्याने विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे हा स्क्रू टोकदार असल्याकारणाने फुफ्फुसांच्या नसांना दुखापत होण्याची शक्यता होती. त्यामुळे हा स्क्रू बाहेर काढणं फार  गुंतागुंतीचं होतं