मुंबई : काही दिवसांपूर्वी MRI मशीनमध्ये खेचला गेल्याने नायर हॉस्पिटलमध्ये एका तरूणाचा बळी गेला. बहिणीच्या सासूला भेटायला गेलेल्या या तरूणासोबत असं काय घडलं हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला असेल. म्हणूनच रूग्णालयात कोणत्याही मेडिकल टेस्ट किंवा इतर रूग्णांना भेटायला जाताना  काळजी घ्या.  


MRI म्हणजे काय ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MRI म्हणजेच magnetic resonance imaging. या मशीनच्या मदतीने शरीराच्या आतील भागांचे खास पद्धतीने फोटो काढले जातात. या फोटोंच्या मदतीने डॉक्टरांना शरीरात नेमक्या कोणत्या जागी समस्या वाढतेय याची अचूक माहिती मिळते. त्यानुसार पुढील उपचार ठरवले जातात.  


MRI मशीनच्या आसपास इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड असते. यामध्ये पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण क्षमतेपेक्षा 20-40 हजार पट अधिक वेगाने वस्तू खेचली जाते. म्हणूनच दृश्य-अदृश्य स्वरूपातही कोणत्याही प्रकारे MRI मशीन  सुरू असलेल्या खोलीत धातूच्या वस्तू नसाव्यात याची काळजी घ्यावी लागते.  


MRI मशीन असलेल्या / टेस्ट करताना कोणत्या गोष्टी हमखास टाळाव्यात ? 


दागिने टाळा  


शरीरावर कोणत्याही प्रकारचे दागिने नसावेत. टेस्टपूर्वी सारे दागिने काढून ठेवा. हेअर क्लिप्स, अंगठ्या टाळा.  


सुती कपडे  


MRI साठी जाताना कपड्याची निवडही काळजीपूर्वक करावी. सुती कपड्याची निवड करा. काही डेनिम, जिन्स किंवा इतर कोणत्याही कपड्यावरही बटणं असू शकतात. त्यातील धातूचा घटक धोकादायक ठरू शकतो. 


मेकअप  


मेकअपमध्येही काही प्रमाणात धातूंचा समावेश असतो. त्यामुळे MRIकरताना तसेच तुम्ही MRI करण्यासाठीदेखील रूग्णाला साथ देणार असाल तरीही मेकअप करणं टाळा.  
स्किन टिंन्ट्स, नेलपॉलिश, मस्कारा, आयशॅडो, ब्लश, लिपस्टिक टाळा. 


टॅटू  


टॅटू इंकमध्येही आयर्न ऑक्साईड घटक असतात. मॅग्नेटिक फिल्ड या घटकांना देखील खेचून घेऊ शकते. त्यामुळे ब्लॅक पिगमेंट्स किंवा आयर्न ऑक्साईडमुळे धोका वाढू शकतो. टॅटू गोंदवलेल्याअ लोकांनी पूर्व परवानगीनेच MRI खोलीत प्रवेश करताना त्याची माहिती संबंधितांना देणं गरजेचे आहे.  


मेडिकल डिव्हाईस 


ज्या रुग्णांना पेसमेकर, मेटॅलिक स्पाईनल रॉड्स, मेटॅलिक प्लेट्स, स्क्रु, ब्रेसेस  लावलेल्या रूग्णांना MRIरूममध्ये प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास 
त्या वस्तू काढून ठेवाव्या लागतात. पेसमेकरसारखी जी मेडिकल डिव्हाईस काढली जाऊ शकत नाहीत अशा  रूग्णांबाबत मात्र डॉक्टरांना इतर काही पर्यायांचा वापर करावा लागतो.