मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी मुंबईमध्ये 20 हजारांहून अधिक रूग्ण सापडले आहेत. यामुळे आरोग्य विभाग पुन्हा चिंतेत आहे. मात्र 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रंटलाई वर्कर्स आणि 60 वर्षांवरील ज्या व्यक्तींना इतर आजार आहेत अशांना लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींना कोविनच्या पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक असणार आहे. 


मुंबई महापालिकेच्या म्हणण्याप्रमाणे, ज्या व्यक्ती तिसऱ्या लसीसाठी पात्र आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन बूस्टर डोस घ्यावा.


बूस्टर डोसबाबत काय आहे सरकारची नियमावली?


  • येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्ष आणि त्यावरील नागरिकांना लसीचे डोस देण्यात येणार आहे

  • वरील सर्व जण दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास तिसऱ्या डोससाठी पात्र ठरतील

  • ऑनलाईन तसंच नोंदणी पद्धतीने सुविधा उपलब्ध होणार 

  • 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतंही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवण्याची आवश्यकता बासणार नाही.  

  • पात्र व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस घ्यावा 

  • सर्व नागरिकांचं सरकारी केंद्रावर विनामूल्य लसीकरण होईल 

  • खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असेल तर केंद्र सरकारने घोषित केलेल्या किंमतीत लस घ्यावी लागेल