मुंबई : पावसाचे दिवस सुरू झाले आहेत.  अशामध्ये साचलेल्या पाण्यामधून मार्ग काढत पुढे जाणं अनेकदा मुंबईकरांना भाग असते. यामध्ये जर तुम्ही मधुमेही असाल तर थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण इतरांच्या तुलनेत मधुमेहींची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. यामुळे पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा धोका अधिक बळावतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे लेप्टो, कॉलरा, टायफॉईड यासारखे अनेक साथीचे आजार पसरतात. त्यामुळे हे आजार जीवघेणे ठरण्याआधीच काळजी घेणं आवश्यक आहे. पावसळ्यात शू बाईटमुळे होणारी जखम अनेकदा दुर्लक्षित राहते. साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे ही जखम भविष्यात गंभीर होऊ शकते. शू बाईटचा वेदनादायी त्रास दूर करतील 'हे' घरगुती उपाय


मधुमेहींनी कोणती काळजी घ्यावी ? 


दूषित पाण्यातून काही बॅक्टेरिया शरीरात जातात. त्यामुळे पावसाळ्यात पाणी गाळून आणि उकळून पिणं आवश्यक आहे. 


पावसाळ्यात उघड्यावरच्या खाणं टाळा. उघड्यावरचे खाल्ल्यामुळे गॅस्ट्रोइन्स्टेशिएल इंफेक्शनचा धोका बळावतो. यामधून डायरिया, उलट्या असा त्रास बळावतो. अशावेळेस तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी या '5' पदार्थांपासून दूरच रहा !


साचलेल्या पाण्यामध्ये व्हेक्टर बॉन डिसिजचे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो.  साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होणार नाही, घराजवळील ठिकाणी डबकी साचून राहणार नाही याची काळजी घ्या. 


विनाकारण अति शारिरीक कष्ट होणार नाही याची काळजी घ्या.  


मधुमेहींनी पायांची काळजी घेणं आवश्यक असते. फ्लूचा धोका टाळण्यासाठी मधुमेही इंजेक्शन घेऊ शकता. एखादी जखम असल्यास टिटॅनसचं इंजेक्शन घ्या. मधुमेहतज्ञांची मदत घेऊन तुमच्या प्रकृतीमध्ये होत असलेल्या चढ -उतारावर लक्ष ठेवा. 


मधुमेहींमध्ये लेप्टोचा धोका टाळण्यासाठी योग्य तज्ञांच्या सल्ल्याने Doxycycline किंवा Azithromycin 48 तासांच्या आत घ्यावे. लेप्टोस्पायरोसिसचा धोका नेमका कोणाला?