Nachanichya Bhakariche Fayde : आजकाल आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. सध्या मुंबईसारख्या शहरी भागात तर फार मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची समस्या उद्भवते आहे त्यामुळे त्यादृष्टीनं आपण काय खातोय आणि पितोय याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातून सध्या हवाही दुषित होते आहे आणि भयंकर उकड्यानंही महाराष्ट्रातील अनेक भागात उष्माघात, उन्हाळ्याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. अशावेळी भरपूर पाणी पिणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यातून सध्या दुसरी एक समस्या भडसावते आहे ती म्हणजे वाढणारं वजन. आपली जीवनशैली ही झपाट्यानं बदलते आहे. अशावेळी आपल्याला आपल्या आहारात योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. जर का तुमचे वजन वाढू लागले असेल तर तुम्ही तुमच्या आहारात योग्य तो बदल करू शकता. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नाचणीच्या भाकरीचा समावेश करून घेऊ शकता. ग्लूटेन फ्री अशी ही नाचणीची भाकरी असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन कमी करण्यासाठी नाचणीची भाकरी : 


 मुख्य म्हणजे वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना नाचणी नियंत्रित करते. तुम्हाला यातून अधिक उर्जा मिळते. सोबतच शरीरातील साखर नियंत्रित राहते. तेव्हा नाचणीच्या भाकरीचा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये समावेश करा. हल्ली आपण पाहतो की लोकांनी गव्हाच्या पिठाच्या पोळ्या हळूहळू कमी केलं आहे आणि अनेकजण भाकरीकडे वळेल आहेत. आपल्या मुळांकडे परत जात आहेत तेव्हा तुम्हीही याचा लाभ घेऊ शकता. 


ब्रेकफास्टसाठी का खावी नाचणीची भाकरी? :


यातून तुम्हाला चांगले पोषकतत्वं मिळतात जे तुमच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, बी-कॉम्प्लेक्स, आर्यन, कॅल्शियम, एन्टी ऑक्सिडंट्स, प्रोटिन, फायबर, कॅलरी, गुड फॅट्स असतात. ज्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. नाचणीचे भाकरी खाल्ल्यानं तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रित राहते. संपुर्ण शरीरात यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. 


अॅनिमियासाठी योग्य : 


आपल्या शरीरात जर का आर्यनची कमतरता असेल तर आपल्याला असलेल्या अॅनिमियाच्या त्रासावरही नाचणीची भाकरी उपायकारक आहे. 


हाडे मजबुत राहतात : 


नाचणीची भाकरी खाल्ल्यानं आपली हाडं अधिक मजबूत राहतात. त्यामुळे आपल्याला अधिकाधिक शक्ती प्राप्त होते. तुम्हाला जर का ऑस्टियोपोरोसिस असेल तर तुम्ही नाचणीची भाकरी खाऊ शकता. 


अमिनो अॅसिड : 


नाचणीच्या भाकरीत अमिनो अॅसिडचे पुरेपूर प्रमाण असते. ज्याद्वारे तुमची त्वचा आणि केस निरोगी राहतात. सोबतच तुमच्या दातांचेही रक्षण होते. 


ब्लड शुगर नियंत्रित ठेवते : 


आजकाल शुगरचा त्रासही अनेकांना आहे. त्यामुळे अशावेळी चांगलंचुंगलं खाणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अशावेळी नाचणीची भाकरी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या शरीरातील साखर ही नियंत्रित राहते. त्यासोबत शरीरातील पचनक्रियाही सुधारते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)