मुंबई : आपल्या त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी केवळ ब्युटी प्रॉडक्ट्स न वापरता निरोगी जीवनशैली आणि पोषक आहाराचे सेवन केल्यास नक्कीच नैसगर्गीकित्या सौंदर्य खुलविता येते. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे घरबसल्या आपल्या त्वचेवर लावण्यात येणारी रासायनिक उत्पादने, प्रखर सूर्यापासून बचाव करण्यासाठी वापरली जाणारी उत्पादने तसेच मेकअपचा वापर टाळला जात असून आपली त्वचा मोकळा श्वास घेत आहे. बाहेरील उत्पादनांचा वापर केला जात नसून त्वचा नैंसर्गीकरित्या देखील स्वच्छ आणि सुंदर राहू शकते याचा प्रत्यय आला आहे. द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी यासंदर्भात टीप्स दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शांत झोप : जर आपण पुरेशी झोप घेत नसाल तर ते लगेचच आपल्या त्वचेवर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतो, डोळ्याखाली काळी वर्तुळे, सुरकुत्या आणि थकवा दिसून येतो. दररोज रात्री किमान 7 तास झोप घेणे गरजेचे आहे.


नियमित व्यायामाच्या सवयी लावा : आठवड्यातून तीन वेळा 45 मिनिटे व्यायाम केल्यास आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहील. व्यायामाचा एक नित्यक्रम आखून त्यानुसार न चूकता व्यायाम करा. आपल्याला लवकरच फरक दिसेल.


सूर्यापासून त्वचेचे संरक्षण करा: सूर्याच्या उष्णतेचा आपल्या त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवा. बाहेर जाताना टोपी घाला. अतिनील किरण त्वचेचे नुकसान करतात. त्यामुळे त्वचा काळवंडणे, त्वचा निस्तेज होणे, काळे चट्टे अशा समस्या दिसून येतात. आपल्याला शक्य तितके स्वतःचे रक्षण करा.


हायड्रेट रहा: ठराविक अंतराने पाणी पिऊन पितात. आपल्या आहारात काकडी, टोमॅटो, कोबी, द्राक्षे आणि टरबूज यासारखे पदार्थ समाविष्ट करा कारण यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्वचेची आर्द्रता योग्य राखल्यास त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते.


तणावापासून दूर रहा – ताणमुळे कॉर्टिसॉल हार्मोनचे जास्त प्रमाणात उत्पादन होते ज्यामुळे त्वचा कोरडी पडते, सुरकुत्या येतात. तणावमुक्त राहण्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या आणि पुरेसा आराम करा.



त्वचेकरिता खास टिप्स


-    मीठ, साखर, मध आणि नारळ तेल यांचे मिश्रण तयार करा. आठवड्यातून दोनदा मृत त्वचा काढून टाकणे.


-    काही द्राक्षे घ्या आणि ती अर्धी कापून घ्या आणि आपल्या त्वचेवर चोळा. जेणेकरून त्वचा स्वच्छ होईल.


-    आय आयक्रिम वापरण्यापूर्वी फ्रिजमध्ये ठेवा. त्यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होईल


- चेहऱ्यावरील छिद्रे बंद करण्यासाठी फेस मास्कचा वापर करा. पपईचा मास्क वापरा.


- सुर्यापासून संरक्षण करणारे मॉईश्चरायझर वापरा.


- रिकाम्या स्प्रे बॉटलमध्ये १ चमचा सी सॉल्ट २०० मिली पाण्यात मिसळा आणि त्यात लव्हेंडर तेलाचे ८ थेंब घाला. ओलसर केसांवर चांगले हे फवारा जेणेकरून केसांमधील कोरडेपणा दूर होईल.


- आपल्या केसांना रासायनिक उत्पादनांचा वापर करू नका.


- अर्धा कप मेयो घ्या आणि ओल्या केसांवरील टिप्स मुळापासून पसरवा. १५ मिनिटांनंतर स्वच्छ धुवा आणि सामान्य प्रमाणे शैम्पू.