मुंबई : अंगदुखी, दातदुखी, डोकेदुखी अशा समस्या लहान सहान वाटत असल्या तरीही त्या कधीही जाणवतात. अशावेळेस त्यांच्यावर मात करण्यासाठी अनेकजण वेदनाशामक गोळ्यांचा वापर करतात. बाजरात सहज उपलब्ध असणार्‍या अशा पेनकिलर्समुळे वेदना झटकन कमी होत असल्या तरीही अनेकांना त्याच्या दुष्परिणांमानाही सामोरे जावे लागते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेनकिलर्सच्या गोळ्या घेऊन दुखण कमी होत असले तरीही त्यामधून इतर अनेक समस्या वाढू शकतात. म्हणूनच डोकेदुखी, अंगदुखी सारख्या दुखण्यांना वेळीच आटोक्यात ठेवण्यासाठी काही घरगुती उपायही वेदनाशामक ठरतात. सोबतच ते सुरक्षित असल्याने दुष्परिणामांचाही धोका कमी होतो. 


1.पोटदुखीचा त्रास  


अपचन, गॅस अशा समस्यांमुळे अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो. तो कमी करायचा असेल तर कपभर कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा ओवा आणि चिमुटभर काळ्या मीठाचं मिश्रण घेतल्यास त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. 


2. तोंड येणे, घसाचे दुखणे 


शरीरात उष्णता वाढली की सहाजिकच तोंड येणे हा त्रास जाणवतो. घशाचं दुखणं, तोंड येणं यामुळे नीट जेवणं शक्य होत नाही. गिळताना त्रास होऊ शकतो. अशावेळेस ज्येष्ठमधाचा काढा आरामदायी ठरू शकतो. 


3. हिरड्यांचं दुखणं 


दातदुखी किंवा हिरड्यांमधील दुखणं हे अनेकदा अचानक वाढतं या दुखण्याला आटोक्यात ठेवण्यासाठी काळामिरीच्या चूर्णाचा मसाज फायदेशीर ठरतो. यामुळे हिरड्यांमधील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.