मुंबई : अनेकदा मुलींना सिवलेस कपडे घालण्याची हौस असते. मात्र डार्क अंडरआर्म्स म्हणजेच काखेतील काळसरपणामुळे अनेकींना त्यांची ही हौस पूर्ण करता येत नाही. काखेतील काळसरपणा कमी करण्यासाठी अनेक ब्युटी ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. मात्र काही घरगुती आणि सुरक्षित उपायांनी देखील काखेतील काळसरपणा कमी करण्यासाठी मदत होते हे तुम्हांला ठाऊक आहे का?  


 कसा कमी कराल काखेतील काळसरपणा  


 लिंबू   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 काखेतील काळसरपणा कमी करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर आहे. काखेमध्ये लिंबाचा रस चोळा. दहा मिनिटांनी थंड पाण्याने हात स्वच्छ  धुवावा. लिंबाचा मंद सुवास घामाचा दुर्गंध कमी होण्यास मदत होते. सोबतच लिंबामधील अ‍ॅसिडीक घटक त्वचेचा पोत नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत करतात.  


 चारकोल पॅक  


 अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोल पावडर पाण्यामध्ये मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट काखेमध्ये लावा. पेस्ट सुकल्यानंतर काख  थंड पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर टॉवेलने पुसा. 'या' फेसपॅकने चुंंबकाप्रमाणे खेचली जाते त्वचेवरील घाण,मळ