मुंबई : आजकाल नाखांचं सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील अनेक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. अनेकींना लांब नखं आवडतात. पूर्वी केवळ गोलाकार स्वरूपात नखांना आकार दिला जात असे मात्र आता नखांनाही वेगवेवेगळे आकार आणि नेलआर्टने सजवले जाते. 
 
 शरीरात काही पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण झाली तर नखांचे आरोग्यही बिघडते. नखं कमजोर होऊन तुटतात. म्हणूनच तुम्हांला नखं वाढवायची असतील तर तुम्हांला काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.   एकदा कापल्यानंतर पुन्हा कसे आणि का येतात नखं?


 नारळाचं तेल   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रात्री झोपण्यापूर्वी नखांना नारळाच्या तेलाचा मसाज करा. हे तेल थोडं गरम करून लावल्यास अधिक फायदेशीर ठरतो. यामुळे नखांना पोषकता मिळते.  


संत्र्याचा रस 


संत्र्याच्या रसामध्ये किमान दहा मिनिटं नखांना बुडवून ठेवा. हा रस सुकल्यानंतर नखांवर मॉईश्चरायझर लावा. रात्री हा उपाय झोपा. सकाळी सामान्यपणे हात स्वच्छ करा. नियमित या उपायामुळे नखांची वाढ होण्यास मदत होते. 


लिंबू 


एका लिंबाच्या रसामध्ये चमचाभर ऑलिव्ह ऑईल मिसळा. या मिश्रणाला गरम करा. या मिश्रणामध्ये नखांना दहा मिनिटं भिजवून ठेवा. थोड्या वेळाने हात स्वच्छ करा. नियमित या उपायांनी नखांची वाढ होण्यास मदत होते. सोबतच नखं कामजोर होण्याचा धोका कमी होतो.  


मध 


चमचाभर नारळाच्या तेलात समप्रमाणात मध मिसळा. यामध्ये काही थेंब रोजमेरी ऑईल मिसळा. हे सारे मिश्रण कोमट स्वरूपात गरम करून नखांना मसाज करा. 


ऑलिव्ह ऑईल 


रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेलामध्ये नखं बुडवून ठेवा. दहा मिनिटांनी नखं पाण्यांनी स्वच्छ करा. यामुळे नखं मजबूत स्वरूपात वाढण्यास मदत होते. 


या घरगुती उपायांसोबतच तुमच्या आहारातही पोषक आणि संतुलित आहाराचा समावेश असणं गरजेचे आहे.