नेमका काय आहे NeoCoV? कोरोनापेक्षा किती धोकादायक?; तज्ज्ञ म्हणतात..
आता दक्षिण आफ्रिकेत NeoCoV या नव्या कोरोनाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून NeoCoV खूप चर्चेत आहे.
दिल्ली : चीनमध्ये सापडलेला SARS-CoV-2 ही गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगासाठी समस्या बनलीये. कोरोनानंतर आलेल्या व्हेरिएंट्सने लोकांचं टेन्शन अजूनच वाढवलं. तर आता दक्षिण आफ्रिकेत NeoCoV या नव्या कोरोनाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून NeoCoV खूप चर्चेत आहे.
NeoCoV या आठवड्यात बराच चर्चेत आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, शुक्रवार 28 जानेवारीपर्यंत, भारतात याला 5 लाखांच्या सर्चसोबत टॉपवर आहे. या नव्या शब्दाने अचानक लोकांची चिंता वाढवली आहे. NeoCoV हा कोरोना व्हायरसचाचा नवीन प्रकार नाही.
काय आहे NeoCoV?
NeoCoV हा शब्द MERS-CoV शी संबंधित असलेल्या व्हायरसच्या व्हेरिएंटसाठी वापरला जातो. 2010 च्या दशकामध्ये MERS-CoV सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि दक्षिण कोरियामध्ये मोठ्या संकटाचं कारण बनला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, MERS-CoV संसर्गाने प्रभावित झालेल्या सुमारे 35 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. NeoCoV हा या विशिष्ट कोरोना व्हायरसचा संभाव्य प्रकार आहे.
NeoCoV नवीन प्रकार आहे का?
NeoCoV ला प्रत्यक्षात कोणतेही फॉर्मल डेसिग्नेशन नाहीये. त्यामुळे या शब्दाची व्युत्पत्ती (origin) शोधणं कठीण आहे. काही तज्ज्ञांनी ट्विटरवर सांगितलंय की, हा कोणताही नवीन कोरोना व्हायरस नाही किंवा म्युटेशन आणि व्हेरिएंट नाहीये.
NeoCoVचा रिसर्च पेपर काय सांगतो?
NeoCoV आतापर्यंत शोधलेल्या MERS-CoV चा सर्वात जवळचं रूप आहे जे वटवाघुळांमध्ये आढळलंय. काही प्रकारचे वटवाघळे NeoCoV ला संक्रमित करण्यासाठी ACE2 (एक पेशी, जिला रिसेप्टर्स असं म्हणतात) वापरू शकतात. NeoCoV T510F म्यूटेशननंतर मानवी पेशी ACE2 ला संक्रमित करू शकते.