Omicron BF.7 : कोरोनामुळे दोन वर्ष सणासुदीचा काळ घरात गेला. त्यामुळे यंदा सगळेच जण सगळे सण उत्साहात साजरे करत आहेत. गणेशोत्सवानंतर दिवाळी धूमधडाक्यात करण्याची तयारी सुरु आहे. पण अशातच महाराष्ट्रात कोरोनाच्या BF.7 या नव्या व्हेरिएंटनं प्रवेश (new omicron variant) केलाय. पुण्यात या व्हेरिएंटचा रुग्ण सापडला आहे. सणवार आणि हिवाळा यामुळे आरोग्य यंत्रणेनं धास्ती घेतली आहे. दिवाळीत कोरोनाचा स्फोट होण्याच्या भीतीनं राज्य आरोग्य विभागानं अलर्ट जारी केलाय.


BF.7 व्हेरिएंट घातक का आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य यंत्रणा इतकी अॅक्टीव्ह मोडवर गेली आहे. BF.7 हा ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट आहे. घशात खवखव, थकवा, सर्दी अशी या व्हेरिएंटची लक्षणं आहेत. एवढंच नाही तर हा व्हेरिएंट अँटीबॉडीजना चकवतो. ओमायक्रॉनपेक्षाही जास्त वेगानं हा व्हेरिएंट पसरत असल्याने धोका आणखी वाढला आहे.


आणखी वाचा - Worlds Menopause awareness month : शारीरिक संबंधांदरम्यान वेदना, Menopause बाबत मोठी गोष्ट उघड


दरम्यान, कोरोना संपत आला असं वाटत असतानाच आता BF.7 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं राज्यात एन्ट्री केलीय. इतरच नाही तर XXB, Omicron- BA.2.3.20 आणि BQ.1 असे व्हेरिएंटही महाराष्ट्रात आढळलेत. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढल्याचं पहायला मिळतंय.


काय काळजी घ्याल...


BF.7 व्हेरिएंट हा प्रकार वेगाने पसरतो. त्यामुळे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. त्याचबरोबर स्वच्छता ठेवणं देखील गरजेचं आहे. वेळोवेळी हात धुणं गरजेचं आहे. बाहेर जाताना मास्क घालणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कोरोनाबाधितांच्या संपर्कात येत नाही. लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे.