उत्तर प्रदेश : तज्ज्ञ किंवा डॉक्टरही अनेकदा सांगतात की, कोणतंही औषध किंवा गोळी घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला घ्या. त्यामुळे कोणतीही गोळी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं, जेणेकरून त्याचे वाईट परिणाम आरोग्यावर होणार नाहीत. अशातच अनेकजण वायग्रा गोळीचं डॉक्टरांच्या सल्लाशिवाय सेवन करतात. मात्र असं करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल काही जण वायग्रा या औषधाच्या गोळ्यांचं सेवन करतात. मात्र वायग्रा या औषधाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. पण काही जण डॉक्टरांकडे न जाता स्वत:च किंवा इतरांच्या सल्ल्याने अशी औषध घेतात. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एका व्यक्तीला वायग्रामुळे रुग्णालयात दाखल कराव लागलं. 


लग्नानंतर शरीरसंबंध ठेवताना चांगल्या लैंगिक संबंधांसाठी वायग्राचा वापर केला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारची औषध घेणं योग्य नाही. दरम्यान उत्तर प्रदेशात एका व्यक्तीच्या बाबतीत नेमकं हेच झालं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले असून वायग्राचा साईड इफेक्ट आयुष्यभर राहणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. काही महिन्यापूर्वीच या व्यक्तीचं लग्न झालं होतं. मित्राच्या सल्ल्याने त्याने वायग्रा घ्यायला सुरुवात केली होती.


दररोज किती प्रमाणात वायग्रा घेत होता?


जितक्या प्रमाणात हे औषध घेतलं पाहिजे, त्यापेक्षा तो जास्त या औषधाचं सेवन करत होता. वायग्राचा ओव्हरडोस झाल्यामुळे या माणसाला रुग्णालयात दाखल करावं लागलं. डॉक्टरांकडे न जाता परस्पर मित्रांच्या सांगण्यावरून या व्यक्तीने वायग्राचा डोस वाढवला. तो दररोज 200 MG एवढ्याप्रमाणात हे औषध घ्यायला लागला. याचा अर्थ निर्धारित प्रमाणापेक्षा चार पटीने जास्त प्रमाणात तो या औषधाचं सेवन करत होता.


पत्नीने गेली सोडून


वायग्राच्या अतिसेवनाने या व्यक्तीच्या शरीरावर फार दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलं. मुख्य म्हणजे या व्यक्तीची पत्नी सुद्धा त्याच्या या सवयीला कंटाळली आणि सोडून माहेरी निघून गेली. अखेर मुलाच्या कुटुंबाने समजूत काढल्यानंतर ती सासरी परतली.
मात्र पुन्हा याला रूग्णालयात दाखल केल्यानंतर ती माहेरी निघून गेली.