मुंबई : गरमीमध्ये लिंबू सरबत पिण्याचे फायदे सर्वांना माहित असतील. पण लिंबू हा अनेक शारिरीक आजारांवर उपाय आहे. पण लिंबू पाणी पिण्याच्या वेळा आणि पद्धतींबद्दल माहीती असणं गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिंबू पाण्यात सॅट्रिक अॅसिड असत जे किडनी स्टोन होण्यापासून रोखते. जर तुम्ही दररोज लिंबूपाणी पित असाल तर तुम्हाला या आजारापासून मुक्तता मिळेल. 
 
तुम्ही लोकांना झोपून उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून पिताना पाहिलं असेल. खरतर याचं एक वैज्ञानिक कारणदेखील आहे. यामुळे व्यक्तीची पचनक्रिया सुधारते. खाण लवकर पचतं आणि व्यक्ती फिट राहतो. 


लिंबूमध्ये विटामिन सी असते. यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. रोज लिंबु सरबत पिणाऱ्यांना सर्दी-पडसं असे आजारा शक्यतो होत नाहीत. 


जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर एक ग्लास लिंबू पाणी प्या. तोंडाला दुर्गंध येणं कमी होईल आणि तोंड कोरड राहणार नाही. 


लिंबू आपल मेटाबॉलिज्म योग्य राखत. याशिवाय यामध्ये फायबरदेखील आहे. वजन कमी करण्यासदेखील यामुळे मदत होते. 


लक्षात ठेवा नेहमी फ्रेश लिंबू पाणीच प्या. लिंबू पाणी कोमट आणि थंड दोन्ही पद्धतीने पिऊ शकता.