मुंंबई : केरळमध्ये निपाह व्हायरसची थैमान पसरलं आहे. फ्रुट्स बॅट या प्रजातीचं वटवाघुळ निपाह व्हायरसचा नैसर्गिक प्रवाहक आहे. त्यामुळे जगभरात या व्हायरसमुळे थैमान पसरले आहे. केरळच्या निपाह व्हायरस पसरण्यामागे वटवाघुळ नसल्याने या आजाराचे गूढ वाढले आहे. वटवाघुळ निपाह व्हायरस पसरण्यामागे कारणीभूत असले तरीही त्याचा इकोसिस्टममध्ये एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र समाजात अनेक समज गैरसमज असल्याने वटवाघुळांबाबतही लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यामध्ये निपाह पसरत असल्याने अजूनच भर पडली आहे. 48 तासात जीवघेणा ठरतोय 'निपाह' व्हायरस


वटवाघुळांबाबत समज गैरसमज - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वटवाघुळांमध्ये अनेक प्रकारच्या प्रजाती असतात. प्रत्येक प्राण्यांमध्ये काही स्वरूपात बॅक्टेरिया असतात. सारेच वटवाघुळ किंवा त्यांच्यामधील व्हायरस लोकांसाठी त्रासदायक असतीलच असे नाही. भारतामध्ये फ्रुट बॅट्स याच्याही अनेक प्रजाती आहेत. यामध्ये ऑनीटेक्टेरिस स्पोलिया, ग्रेटर इंडियन फ्लाइंग फॉक्स, हिप्पोसिडेरस लार्वाट्स आणि स्कॉटोफिलस कुहली या वटवाघुळांमध्ये निपाह व्हायरस आढळतो. 


गेल्या काही दिवसांपासून तुम्ही वटवाघुळांच्या बाबतीत किंवा त्यांच्यामुळे अनेक वाईट गोष्टी घडलेल्या ऐकल्या किंवा पाहिल्या असतील पण वटवाघुळांमुळे होणारे फायदे तुम्हांला ठाऊक आहेत का? 


1. वटवाघुळ आणि शेतकरी - वटवाघुळ कीडे, माशा खातात. या माशा पीकांचं नुकसान करतात. महाराष्ट्रातील अजंठा आणि वेरूळ येथील गुंफांमधून वटवाघुळ हटवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र या गोष्टीचा उलटा परिणाम दिसून आला आहे. वटवाघुळांना हटवल्याने गुंफेजवळ कीडे वाढायला लागले. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पुन्हा वटवाघुळांना तेथे वसवण्यात आले. Nipah Virus चा धोका : वटवाघुळांंना सर्वाधिक आवडतंं 'हे' फळ !


2.घरात वटवाघुळ डासांना दूर ठेवतात. एका अभ्यासानुसार, वटवाघुळं त्यांच्या शरीराच्या वजनाइतके डास खाऊ शकतात. एक लहान वटवाघुळ सुमारे 500 डास एकावेळी खाऊ शकतात. 


3. वटवाघुळांच्या विष्ठेमध्ये नयट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम घटक असतात. हे घटक जैविक खाद्यांप्रमाणे काम करतात. 


4. काही वटवाघुळं झाडांवर तर काही त्यांच्या स्वतःच्या जागी फळं आणून खातात. दरम्यान जेव्हा फळांच्या बीया खाली पडतात तेव्हा आपोआपच यामधून फळांच्या झाडांची पेरणी होते. प्रामुख्याने यामध्ये आंबा, पेरू, या फळांचा समावेश असतो. 'निपाह' व्हायरसची दहशत पसरवाणारी करोडो वटवाघुळं 'या' गावात एकत्र फळं खातात


5. वटवाघुळांच्या शरीरातून बाहेर पडणार्‍या काही ठराविक वासामुळे असे काही व्हायरस नष्ट होतात ज्यामुळे मानवी आयुष्य धोक्यात येऊ शकते.   'निपाह' बाबत आश्चर्यकारक खुलासा ! हा सगळ्यात घातक व्हायरस नव्हे


समज - गैरसमज - 


भारतात अनेक कुटुंबांमध्ये घरात वटवाघुळांचा वावर हा अशुभ मानला जातो. परंतू फेंगशुईच्या मानण्यानुसार, वटवाघुळ घरात सुख, समृद्धी घेऊन येतात. यामुळे तुमचं आयुष्य वाढते. अजब : ४०० वटवाघुळांसोबत राहणारी महिला


भारतामध्ये काही ठिकाणी केली जाते पूजा - 


बिहारमध्ये ऐतिहासिक वैशालीगड येथे वटवाघुळांची पूजा केली जाते. तेथे वटवाघुळ त्यांचे रक्षण करते अशी त्यांची धारणा आहे. काही वर्षांपूर्वी वैशालीमध्ये एका गंभीर आजाराची साथ पसरली होती. तेव्हा तेथे वटवाघुळंचे वास्तव्य करण्यास सुरूवात झाली. तेव्हापासून या भागात गंभीर आजाराची साथ पसरणं थांबलं आहे. तेथील समाज वटवाघुळ शुभ असल्याचे मानायला लागला आहे. फ्रुट्स बॅट्स प्रजातीचं वटवाघुळ उजड भागात राहते. मात्र जंगलांची संख्या घटत असल्याने खाद्य शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये मानवी वस्तीमध्ये वटवाघुळांचे वावरणं वाढले आहे.  Nipah Virus चा धोका पाहता फळं खाणं टाळावे का? वाचा हा एक्सपर्ट सल्ला ​