मुंबई : केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यामध्ये 'निपाह' व्हायरसमुळे  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे 48 तासाच्या आत रूग्णाला उपचार न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होत आहे. रूग्ण कोमामध्ये जाण्याची किंवा दगावण्याची शक्यता असल्याने देशभरात या व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 48 तासात जीवघेणा ठरतोय 'निपाह' व्हायरस


महाराष्ट्र, गोव्यातही अलर्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झपाट्याने निपाह व्हायरस मनुष्याच्या आरोग्यावर अटॅक करत असल्याने देशभरात संबंधित आजाराबद्दल जनजागृती निर्माण केली जाणार आहे. महाराष्ट्रातही या आजाराबाबत दक्षता घेण्यासाठी आरोग्यव्यवस्था सज्ज झाल्याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा : 'या' गावात पहिल्यांदा आढळला जीवघेणा 'nipah virus'


कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये खास वॉर्ड    


राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत संशयित रूग्णावर उपचार करण्यासाठी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये एक खास वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे. सोबतच प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांना दक्ष राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने पर्यटक विविध ठिकाणी फिरायला जातात. अशात केरळला जाणारे किंवा तेथून परतणार्‍या पर्यटकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. निपाह व्हायरसमुळे नर्सचा बळी; मृत्युपूर्वी पतीला लिहिले हृदयद्रावक पत्र


खास आयसोलेशन वॉर्ड 


मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात एक 'आयसोलेशन वॉर्ड' तयार करण्यात आला आहे. यापूर्वी 'एच 1 एन  1' या व्हायरसच्या बाधित रूग्णांवरही अशाच प्रकारे उपचारांसाठी खास वॉर्ड राखीव ठेवण्यात आला होता. कस्तुरबा रूग्णालयामध्ये खास प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.