मुंबई : विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी आकारणाऱ्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना चाप बसवण्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशनने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार, आता देशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील 50 टक्के जागांचं शुल्क सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांइतकंच असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे.


खाजगी महाविद्यातील फीमध्ये मोठा बदलाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) अधिसूचना जारी करून देशातील सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील 50 टक्के जागांची फी ही त्या संबंधित राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्काप्रमाणे असणार असल्याचं सांगतिलं आहे.


अतिरिक्त फी वसूल करू शकणार नाहीत


त्याचप्रमाणे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या उर्वरित 50 टक्के जागांचं शुल्क त्या-त्या राज्यातील शुल्क नियामक प्राधिकरणाकडून ठरवलं जाणार आहे. याशिवाय कोणतंही वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन देणगी सारखं कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाही.


खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या ज्या 50 टक्के जागांवर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या बरोबरीने शुल्काची तरतूद करण्यात आली आहे, त्यांना गुणवत्तेच्या आधारावर म्हणजेच NEET परीक्षेच्या क्रमवारीच्या आधारे प्राधान्य दिलं जाईल.