मुंबई : जगभरात आज सगळीकडे जागतिक नो 'नो डाइट डे' ( International No Diet Day 2022 ) साजरा केला जातोय. 6 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. लठ्ठपणा, वाढतं वजन, अशक्तपणा, बेली फॅट यांसारख्या समस्यांना बाजूला ठेवून लोकं या दिवशी स्वतःबद्दलचे प्रेम ( Self Love ) व्यक्त करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नो डाइट डे'च्या दिवशी, बॉडी शेमिंगसारखं वर्तन बाजूला ठेवून, लोकांनी शरीर स्वीकारण्याबद्दल जागरूक केलं जातं. ज्यामध्ये शरीराची सर्व साईज आणि आकार यांचा समावेश असतो.


वेळोवेळी आपण आपल्या डाएटमध्ये 'चीट डे'चा समावेश केला पाहिजे, असं सांगितलं जातं. यामुळे सतत बाहेरचं खाण्याची सवय लागणार नाही किंवा त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.


International No Diet Day चा इतिहास


1992 मध्ये ब्रिटीश महिला मेरी इव्हान्स यांनी यूकेमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय नो-डाएट दिवस साजरा केला होता. मेरीचा उद्देश लोकांना पटवून देण्याचा होता की, त्यांनी स्वतःला जसे आपण दिसतो तसं स्वीकारलं पाहिजे. डाएटिंगमुळे होणाऱ्या हानीबद्दल लोकांना जागरुक व्हावे अशी मेरीची इच्छा होती.


'नो डाइट डे' चं महत्त्व


  • डाएटबाबत लोकांना योग्य माहिती व्हावी

  • स्वतःला जसे आपण दिसतो तसं स्विकारा आणि स्वतःवर प्रेम करा

  • कॅलरीजची चिंता न करता लोकांना खाण्यासाठी प्रोत्साहित करणं