Which Water is Good to Drink: पार्टीssss.... असं म्हटलं तरीही आपल्या डोळ्यांसमोर मित्रांचा गोतावळा, एखादं हॉटेल, टेबलावर गर्दी करून बसलेली आपलीच सगळी मंडळी आणि त्यापैकी बहुतेकांच्या हाती असणारा जाम, असंच चित्र येतं. तुम्हीही त्यातलेच? बरं या गर्दीत फक्त कोल्ड्रींक पिणारे आणि त्यातही काही फक्त पाणी पिणारेही बरेच असतात. इथं मध्येच मद्यपान करणारे आपले दोस्त त्यांच्या हातातील जाम संपला की नकळतपणे पाण्याचा ग्लास तोंडाला लावतात. मुळात हे कितपत योग्य आहे? मद्यपानानंतर पाणी प्यावं का? आणि प्यायल्यास ते कसं असावं? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? 


मद्यपानानंतर पाणी पिणं योग्य? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात मद्यपान करणंच आरोग्यासाठी घातक. पण, तरीही काही मंडळी 'शौक बडी चीज है' असं म्हणत हा मद्याचा प्याला घटाघट पितात. एक बाब लक्षात घ्या मद्यपान केल्यानंतर तातडीनं साधं पाणी प्या. असं न केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतील. कारण, मद्यामुळं शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. अशा परिस्थितीत साधं पाणी शरीरातील पाण्याची गरज भरून काढतं. त्यामुळं मद्यपानानंतर गरम किंवा थंड नव्हे, तर साधंच पाणी प्या. 


डोकं गरगरत असल्यास, उन्हातून घरात आल्यास, प्रचंड तहान लागल्यास, ब्लिडींग डिसऑर्डर असल्यास किंवा अन्नातून विषबाधा झाल्यास साधं पाणीच प्यावं. आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार साधं पाणी बनवण्याचीही पद्धत आहे. 


हेसुद्धा वाचा : चहा पावडरनं किचन सिंक इतकं स्वच्छ होईल की झुरळं, किटक फिरकणारही नाहीत 


 


पाणी थंड किंवा गरम नसणं म्हणजे ते साधं असणं असा तुमचा समज असेल तर तसं नाहीये. आयुर्वेदानुसार सर्वप्रथम पाणी उकळून ते शुद्ध करून घ्यावं आणि त्यानंतर ते नैसर्गिकरित्या थंड होऊ द्यावं. अशा प्रकारचं साधं पाणी पिण्याचे शरीराला कैक फायदे आहेत. 


गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे फायदे... 


गरम पाणी कायमच थंड करून प्यावं असंही नाही. कारण, भूक कमी असल्यास, पचनशक्ती कमकुवत असल्या, घशाला सूज असल्यास, ताप किंवा सर्दी असल्यास, शरीरात वेदना असल्यास, पोट फुगल्यासारखं वाटल्यास सोसेल तितकं गरम किंवा कोटम पाणी प्यावं. यामुळं शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. काय मग, पाणी पिताना तुमच्याकडूनही अनावधानानं काही चुका होतात? आताच त्या टाळा आणि निरोगी जगण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाका. 


(वरील माहिती सर्वसामान्य आणि वाचनीय संदर्भावर आधारित असून, झी 24 तास त्याची खाजरजमा करत नाही. )