Home remedies for Blocked Nose: सध्या थंडी गायब असली तरी थंडीचा मौसम सुरु आहे. अनेक ठिकाणी थंडी आहे. ( Health News in Marathi ) हिवाळ्यात नाक बंद ( Blocked Nose) होण्याची समस्या खूप त्रासदायक असते. याशिवाय सर्दी-पडसेचा त्रासही कायम राहतो. असे घडते कारण हिवाळ्यात थंडीमुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया जास्त हल्ला करतात. या कारणास्तव, नाकात संसर्ग देखील होतो. नाकाच्या आत असलेल्या पडद्यामध्ये सूज येते आणि या कारणास्तव, नाकात अनेक वेळा सूज येते आणि नाक बंद होते. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती मजबूत नसते, त्यांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. नाक बंद होण्याच्या समस्येतून सुटका करण्यासाठी आपण कांद्याची साल आणि कांद्याचा रस वापरु शकता.  (Latest Health News) 


बंद नाकासाठी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्यात नाक बंद होणे ही एक सामान्य समस्या आहे. अशावेळी कांद्याचा रस आणि त्याची साल वापरता येते. या दोन्ही गोष्टी खूप फायदेशीर ठरु शकतात. बंद नाकातून सुटका हवी असेल तर अशा प्रकारे कांदा वापरावा. 


1. ज्या लोकांना नाक बंद होण्याची समस्या असते. त्यांना 4 ते 5 मिनिटे कांद्याच्या सालीचा वास घ्यावा लागतो. असे केल्याने त्यांना नक्कीच फायदा होईल. या सालींमध्ये असे गुणधर्म असतात जे तुमचे नाक चोंदण्यापासून संरक्षण करतात.


2. याशिवाय तुम्ही कांद्याचा रस देखील वापरु शकता. यामुळे नाक बंद होण्याची समस्याही दूर होते. यासाठी लाल कांद्याचा रस काढून त्याचे काही थेंब नाकात टाकावे लागतील. असे केल्यास त्याचा लाभ लगेच मिळेल. 


3. कांद्यामध्ये नाकातील बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करणारे गुणधर्म आहेत. त्याचा वापर केल्यास नाकाच्या पडद्याला आलेली सूज कमी होते, त्यामुळे नाकातील अडथळे दूर होतात. 


 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)