Turmeric: अशा लोकांनी चुकूनही हळद खाऊ नये, अन्यथा...
Side Effects Of Turmeric: कोणत्या लोकांनी हळदीचा आहारात वापर करू नये. काही लोकांनी हळद खाल्ल्यास आरोग्याला फायदे होण्याऐवजी त्रास होऊ शकतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
These People Should Not Eat Turmeric: हळद हा एक असा मसाला आहे. हळदीचा स्वयंपाकघरात भरपूर वापर केला जातो. त्यामुळे जेवणाची चव तर वाढतेच पण आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदा होतो. मात्र, हळदीतून प्रत्येकासाठी समान फायदे मिळतातच असे नाही. आपल्यापैकी बरेच लोक आहेत ज्यांना हळदीमुळे त्रास होऊ (side effect of Haldi) शकतो. आज आपण जाणून घेऊयात की, कोणत्या लोकांनी हळदीचा आहारात वापर करू नये. काही लोकांनी हळद खाल्ल्यास आरोग्याला फायदे होण्याऐवजी त्रास होऊ शकतो.
जर तुम्ही या आजारांना बळी पडत असाल तर हळद खाऊ नका
1. मधुमेही रुग्ण : जे लोक मधुमेहाच्या (diabetes) आजाराने ग्रस्त आहेत ते सहसा त्यांचे रक्त पातळ ठेवण्यासाठी अनेक औषधे घेतात. तसेच त्यांना ग्लुकोजची (Glucose) पातळी नियंत्रित करावी लागते. मधुमेहाच्या रुग्णांनी हळदीचे जास्त सेवन केल्यास त्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते जे शरीरासाठी अजिबात चांगले नाही.
2. कावीळचे रुग्ण : ज्यांना कावीळ (Jaundice) झाली आहे त्यांनी हळद शक्यतो टाळावी. जर तुम्हाला अजूनही हळद (Turmeric) खायची असेल तर यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि सीरम बिलीरुबिनची पातळी वाढू शकते.
वाचा : हा 'इलेक्ट्रॉनिक टॅटू' सांगेल तुमचा रक्तदाब, जाणून घ्या कसा काम करतो
3. स्टोन रुग्ण : स्टोन (Stone) हा एक अतिशय गुंतागुंतीचा आजार आहे. ज्यांना या समस्येचा सामना करावा लागतो. त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत हळदीचे सेवन कमी करा. अन्यथा समस्या वाढू शकते.
4. रक्तस्त्राव रुग्ण : ज्यांना नाकातून किंवा शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव (Bleeding) होत असेल त्यांनी हळदीचे सेवन कमी करावे अन्यथा रक्तस्त्राव वाढू शकतो आणि शरीरात रक्ताची कमतरता होऊ शकते. जे भविष्यात अशक्तपणाचे कारण बनू शकते.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS NEWS याची पुष्टी करत नाही.)