मुंबई : आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठ्पणाची समस्या वाढत आहे. वाढत्या लठ्ठपणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र स्त्रियांमध्ये वाढणारी लठ्ठपणाची समस्या काही गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते.  90,000 हून अधिक महिलांवर करण्यात आलेल्या प्रयोगानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.  


संशोधकांचा दावा -  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

' द लॅसेट डायबिटीज आणि इंडोक्राइनोलॉजी'च्या अहवालानुसार महिलांमधील लठ्ठपणा हृद्याशी निगडीत काही आजारांना कारणीभूत ठरत आहे. मेटॅबॉलिझमशी निगडीत काही त्रास असला किंवा नसला तरीही त्याचा परिणाम हृद्याच्या आरोग्यावर होतो. 


मेटॅबॉलिक सिंड्रोम असणार्‍यांमध्ये हृद्यविकाराचा धोका संबंधित आजार जडण्याची शक्यता दुप्पटीने अधिक असते. यामध्ये हृद्यविकाराचा झटका, स्त्रोकचा त्रास बळावण्याचीही शक्यता असते. यासोबतच उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात नसणं, असमान्य ब्लड फॅट्स यांचा समावेश असतो. 


मेटॅबॉलिझमशी निगडीत नसलेल्या महिलांमध्येही हृद्याशी निगडीत आजाराचा धोका असल्याने स्वतःच्या आरोग्याबाबत महिलांनी दक्ष राहणं गरजेचे आहे.