कोरोना चाचणीसाठी वापरली जातेय आक्षेपार्ह पद्धत; अनेक देशांचा विरोध
कोरोना चाचणीसाठी अधिकाऱ्यांनी अवलंबलेली ही पद्धत अनैतिक असल्याचंही म्हटलं जातंय.
बिजींग : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसने अनेकांचे प्राणंही घेतले आहेत. ही गंभीर महामारी रोखण्यासाठी सर्व देश कोरोना टेस्टिंग वाढवण्यात भर देतायत. तर आता चीनने चाचणीसाठी अशी पद्धत अवलंबली आहे, ज्यामुळे तुम्हाला राग अनावर होईल.
आक्षेपार्ह पद्धतीने होतेय कोरोना टेस्ट
कोरोना चाचणीसाठी अधिकाऱ्यांनी अवलंबलेली ही पद्धत अनैतिक असल्याचंही म्हटलं जातंय. अधिकाऱ्यांनी व्यक्तींच्या गुदद्वारात स्लाइड टाकून स्वॅबचे नमुने घेतले आणि ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. यामध्ये एका महिलेला संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना विषाणूची चाचणी करण्याचा हा सर्वात अचूक मार्ग असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.
एका अहवालानुसार, गेल्या वर्षी मार्चमध्ये चीनमधील श्वसन रोगाचे तज्ज्ञ ली टोंगझेंग यांनी सांगितलं की, कोरोना विषाणूच्या तपासणीमध्ये नाक किंवा घशातून नमुने घेणं फारसे फायदेशीर नाहीये. त्याचे चाचणी परिणाम फारसे अचूक येत नाहीत. गुदद्वारात स्लाइडचा वापर करून स्वॅबचे नमुने घ्यावेत, असा सल्ला त्यांनी दिला. चीनने आता 10 महिन्यांनंतर या सूचनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.
अमेरिका-जपानकडून होतोय विरोध
चीनच्या या विचित्र कोरोना चाचणीवरून वाद सुरू झाला आहे. दरम्यान अमेरिकेने या निर्देशावर आक्षेप घेत हे मानवी प्रतिष्ठेच्या विरुद्ध असल्याचं म्हटलंय आहे. चीनचा शेजारी देश जपाननेही या विचित्र चाचणीवर नाराजी व्यक्त केलीये.