मुंबई : कानामध्ये मळ निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. कानाचं आरोग्य त्यावर अवलंबून असतं. मात्र कानामध्ये अतिप्रमाणात मळ साचल्यास इंफेक्शन, कानदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे कानात खाज येण्याचाही त्रास अनेकांना जाणवतो. अशावेळेस सतत कानात पिन, टोकदार वस्तू घालणं त्रासदायक ठरू शकतं. म्हणूनच कानातला मळ मऊ करून बाहेर काढणयसाठी काही विशिष्ट तेल मदत करतात. 


कोणत्या तेलाचा करा वापर? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानातील मळ साफ आणि मऊ करण्यासाठी बेबी ऑईल आणि ऑलिव्ह ऑईल मदत करते.  1-2 चमचे बेबी ऑईल थोडं गरम करा. त्यानंतर मान थोडी वाकडी करून कानामध्ये त्याचे थेंब टाका. तेल टाकण्यासाठी बोटांचा किंवा आयड्रॉपरचा वापर करा. रात्री झोपण्यापूर्वी सलग 3-4 दिवस हा उपाय केल्याने मळ मोकळा होण्यास मदत होते. 


बेबी ऑईलसोबत अल्कोहलचे काही थेंबही मिसळणं फयादेशीर ठरू शकतं. यामुळे बॅक्टेरियल इंफेक्शन कमी होण्यास मदत होते. कानात गेलंलं पाणी बाहेर कसं काढाल?


अन्य घरगुती उपाय 


आल्याचा आणि लिंबाचा रसदेखील कान साफ करण्यास मदत करतात. कानात आल-लिंबाचा रस टाकल्यानंतर अर्धा तासाने कापसाच्या गोळ्याने कान स्वच्छ करा. 


तुळशीचा रस, कांद्याचा रसदेखील फायदेशीर ठरतो. यामुळे कानातील मळ मोकळा होतो. या घरगुती उपायांनी कानदुखीचा किंवा कानातील मळ मोकळा होण्याचा त्रास कमी न झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.