मुंबई : अनेकदा पावसात भिजताना काळजी न घेतल्यास, स्विमिंग पूलमध्ये पोहताना किंवा डोक्यावरून आंघोळ करतानादेखील कानात पाणी जाते. कानात पाणी गेल्यास अनेकांना तीव्र कानदुखीचा त्रास होतो. कानात पाणी जमा राहिल्यास इंफेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर पाणी काढून टाकावे.
कानामध्ये पाणी गेल्यास ते तात्काळ बाहेर काढणं गरजेचे अअहे. याकरिता तुमचं डोकं एका बाजूला झुकवा. आणि कानाजवळील बाहेरचा भाग थोडा खेचा. कानात नलिकेमध्ये साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी यामुळे मदत होते.
कानात पाणी गेल्यानंतर कानाच्या त्या बाजूला डोकं झुकवा. आणि एका पायावर उड्या मारा. असे 2-4 वेळेस केल्यानंतर कानातील पाणी बाहेर येईल.