Omicron Symptoms: डेल्टा व्हेरिएंटनंतर आता भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant) सर्वात वेगाने पसरत आहे. बुधवारी देशात कोरोनाची 58,097 प्रकरणे नोंदवली गेली तर  Omicron प्रकरणं  2135 पर्यंत पोहचली आहेत. ओमायक्रॉन संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, त्यामुळे याला सामोरे जाण्यासाठी सर्व राज्यांमध्ये निर्बंध लादले जात आहेत तसंच लोकांना अतिरिक्त खबरदारी घेण्यास सांगितलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमायक्रॉन बाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं जाणवत आहेत. बहुतांश रुग्णांना श्वसनाचा त्रास होत नाही, अशात ओमायक्रॉनची लक्षणं पहिल्यांदा कधी दिसतात हे तुम्हाला माहित आहे का?


लक्षणं दिसण्याच्या काळात बदल
ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत संसर्ग होण्यापासून लक्षणं दिसण्यापर्यंतच्या काळात बदल झाला आहे. शिकागो विभागाचे सार्वजनिक आरोग्य आयुक्त डॉ. अ‍ॅलिसन आर्वेडी यांनी केलेल्या दाव्यानुसार 'कोविडच्या संपर्कात येण्यासाठी आणि संसर्गाचा प्रसार होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लागणारा वेळ देखील कमी झाला आहे. 


कोविडची लक्षणे किती लवकर दिसून येतात?
अमेरिकेतील  सीडीसी (सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन) च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, सामान्य व्यक्ती व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर 2 ते 14 दिवसांच्या आत COVID ची लक्षणे दिसू शकतात.


लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करावी. काही वेळा लक्षणं दिसत नाही, पण अशी लोकं विषाणू पसरवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, अनेक वेळा लक्षणे दिसण्यापूर्वीच संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू लागतो.


लोक सर्वात जास्त कोविडच्या संपर्कात कधी येतात
सीडीसीच्या मते, सुधारीत मार्गदर्शक तत्त्वांनुसार एखाद्या व्यक्तीला लक्षणे सुरू होण्याच्या 1 ते 2 दिवस आधी आणि लक्षणे सुरू झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी इतरांना संसर्ग पसरण्याचा धोका असतो.


7 दिवसांनंतर व्हायरस पसरण्याचा धोका कमी होतो.  5 ते 7 दिवस त्या लोकांना लसीकरण केलं आहे की नाही किंवा त्यांची स्थिती यावर देखील अवलंबून आहे, पण व्हायरस पसरण्याचा धोका खूप कमी होतो. CDC मार्गदर्शक तत्त्वांनुसार लक्षणं नसलेल्या लोकांना अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी किमान २ दिवस अधिक संसर्गजन्य मानलं जातं.


विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर चाचणी केव्हा करावी
सीडीसीच्या म्हणण्यानुसार, जर कोणीही विषाणूच्या संपर्कात आलं किंवा कोणतीही लक्षणे दिसू लागताच त्यांची तपासणी केली पाहिजे. जर अशी लक्षणे दिसली तर निगेटिव्ह रिपोर्ट येईपर्यंत त्याला ताबडतोब क्वारंटाईन करावे.


लक्षणं दिसत असतील, पण चाचणी निगेटिव्ह आली असेल तरी काळजी घ्या. कारण कोविडची अशी काही लक्षणे देखील आहेत जी सामान्य आजारासारखी आहेत. जसं की घसा खवखवणे, डोकेदुखी, सौम्य ताप, अंगदुखी. त्यामुळे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर यापैकी काही लक्षणे दिसली, तर काही दिवसांनी पुन्हा कोविड चाचणी करा.


तर होम क्वारंटाईन व्हा
ज्यांना असे वाटते की ते कोविड पॉझिटिव्ह असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत आणि त्या व्यक्तीने लसीकरण केलेले नाही, त्यांनी ताबडतोब स्वतःला क्वारंटाईन करावे. त्यानंतर लक्षणे दिसतात की नाही हे पाहावे. लक्षणे दिसत नसल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही क्वारंटाईनमधून बाहेर पडू शकता.


डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा
ज्या लोकांना कोविडची गंभीर लक्षणे आहेत किंवा ज्यांना खाली नमूद केलेल्या समस्या आहेत, त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- श्वास घेण्यास त्रास होणं
- सतत छातीत दुखणे
- त्वचेचा रंग बदलण
- ओठांचा किंवा नखांचा रंग बदलणे