मुंबई : कोरोनाचा व्हेरिएंट ओमायक्रॉनने पुन्हा एकदा त्याचे रूप बदललं आहे. आता Omicron चे नवीन sub-variant BA.2.75 समोर आला आहे. हा व्हायरस कोरोना संसर्ग वेगाने पसरवतो. कोरोनाच्या व्हेरिएंट्सवर लक्ष ठेवणारी केंद्र सरकारची संस्था INSACOG मधील एका वरिष्ठ तज्ज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे, नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या BA.5 प्रकारापेक्षा खूप जलद संसर्गजन्य आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमिक्रॉनच्या या सब-व्हेरिएंटमुळे, गेल्या आठवड्यात देशात एक लाखांहून अधिक नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. 7 दिवसांचा हा आकडा गेल्या चार महिन्यांतील उच्चांक आहे. 


27 जून ते 3 जुलै दरम्यान कोरोनाची 1.11 लाखांहून अधिक नवीन प्रकरणं समोर आलीयेत. या कालावधीत किमान 192 मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 44 टक्के मृत्यू केरळमध्ये झाले आहेत.


BA.2.75 शरीरात तयार झालेल्या एंटीबॉडीना दाद देत नाही


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, BA.2.75 व्हेरिएंटमध्ये 80 पेक्षा जास्त वेळा बदल झाले आहेत. तज्ज्ञांना या व्हेरिएंटबद्दल सर्वात जास्त चिंता आहे, जे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी शरीरात तयार केलेल्या एंटीबॉडीजना चकमा देऊ शकतात.