मुंबई : आता दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रोन प्रकाराबाबत आणखी एक भितीदायक बाब समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांचं म्हणणे आहे की, यावेळी 5 वर्षांखालील मुलांमध्येही संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जरी, सर्व मुलांना Omicron ची लागण होत नाही, तरीही मुलांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Omicron व्हेरिएंटची शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेत 16,055 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत आणि 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दररोज केवळ 200 प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी लहान मुलांबाबत चिंता व्यक्त केली आहे.


दक्षिण आफ्रिकेत नऊ वर्षाच्या खालच्या वयातील मुलांना सर्वाधिक ओमायक्रोनची लागण झाली आहे. विशेषज्ञांच्या मते, लहान मुलांमधील लक्षणं काहीशी कमी असल्याने चिंतेचं कारण नाही. 100 हून अधिक लहान मुलांवर गौतेंग भागातल्या रुग्णालयात सुरू आहेत.


दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेसच्या डॉ. वासिला जसत म्हणाल्या, "लहान मुलांना कोणत्याही विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. पूर्वीही असंच दिसून आलं आहे. तिसऱ्या लाटेत 5 वर्षांखालील मुलं आणि 15 ते 19 वर्षे वयोगटातील तरुणांची रूग्णालयात दाखल होण्याची संख्या वाढली होती. मात्र आता चौथ्या लाटेत 5 वर्षांखालील मुलांमध्ये संसर्ग वाढण्याचा ट्रेंड दिसून आला आहे."


यावेळी वेगळा ट्रेन्ड


ते म्हणाले, "अपेक्षेप्रमाणे मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण अजूनही कमी आहे. परंतु 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये ते अधिक वेगाने वाढतंय. 60 वर्षांवरील वृद्धांना या विषाणूची सर्वाधिक लागण झाली आहे आणि 5 वर्षांपेक्षा लहान मुलांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे." यावेळी काही वेगळे ट्रेंडही पाहायला मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.