दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून काही प्रमाणात रूग्णसंख्या आटोक्यात आल्याचं चित्र आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाचा नवा व्हेरिएंट लोकांमधील इम्युनिटी वाढवण्याचं काम करतोय. ICMR ने एक अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ICMR चा एक अभ्यास समोर आला आहे. या अभ्यासानुसार असं मानलं जातं की, ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी ठरू शकतो. अभ्यासात असं म्हटलंय की, डेल्टा व्हेरियंटपासून कोरोनाचाच दुसरा व्हेरिएंट ओमायक्रॉन व्हेरियंट संरक्षण देऊ शकते. डेल्टा व्यतिरिक्त, तो इतर अनेक व्हेरिएंटवर प्रभावी असू शकतो.


दरम्यान यासंदर्भात WHO च्या मुख्य सायंटीस्ट सौम्या स्वामीनाथन यांनी मत व्यक्त केलं होतं. 


स्वामीनाथन म्हणाल्या की, 'ओमायक्रॉनचं इन्फेक्शन डेल्टाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवू शकतं. परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केलं असेल. तुम्ही कोरोना लसीचे डोस घेतले नसल्यास नवा व्हेरिएंट काम करणार नाही."


एका अभ्यासाचा हवाला देत सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, लसीकरणामुळे ओमायक्रॉन विरुद्ध प्रतिक्रिया होण्यास मदत होते. लसीकरण केलेल्या लोकांमध्ये व्हायरसची न्यूट्रलायझेशन क्षमता जास्त असल्याचं आढळून आलंय. लसीकरण झालेल्या लोकांमध्ये डेल्टाविरूद्ध न्यूट्रलायझिंग इम्युनिटी वाढली आहे. लसीकरण न झालेल्या लोकांसोबत असे घडलेलं नाही.