मुंबई : भारतात कोरोना व्हायरसच्या XE व्हेरिएंटची पुष्टी झाल्यापासून सर्व आरोग्य संस्था आणि तज्ञांची चिंता वाढली आहे. ओटीपोटात दुखणं, उलट्या होणं ते डोकेदुखीपर्यंत लक्षणं आहेत. आतापर्यंत Omicron च्या अनेक सब-व्हेरिएंटची माहिती समोर आली. मात्र हा कोरोना इतर व्हेरिएंटपेक्षा 10 पट वेगाने पसरत असून तो अधिक संसर्गिक असल्याचं म्हटलं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्याप्रमाणे, XE व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 यांच्या मिश्रणाने तयार झाला आहे. XE व्हेरिएंट BA.2 पेक्षा 10 पट जास्त संसर्गजन्य आहे. 


INSACOG ने दिलेल्या माहितीप्रमाणे, सध्या भारतात नोंदवण्यात येत असलेल्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये Omicron (BA.2) अधिक प्रभावी आहे. हा एक डॉमिनंट व्हेरिएंट आहे, जो दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये आढळला. 


XE व्हेरिएंटमुळे चौथ्या लाटेचा धोका


Omicron च्या BA.2 व्हेरिएंटमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट आली. जानेवारी 2022 मध्ये जेव्हा कोरोना पीकवर होता, तेव्हा साडेतीन लाख प्रकरणं नोंदवण्यात आली होती. BA.1 आणि BA.2 चा समावेश असलेल्या XE व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, जर XE व्हेरिएंटमुळे चौथी लाट आली, तर कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणं 10 पट वेगाने वाढू शकतात.


मुंबई आणि गुजरातमध्ये सापडला XE व्हेरिएंट


भारतात कोरोना विषाणूच्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण मुंबईत आढळून आला होता. यानंतर गुजरातमधून एक प्रकरण समोर आलं होतं.