मुंबई : गेल्या 2 वर्षांत, कोरोना विषाणूने अनेक वेळा त्याचं रूप बदललं आहे. चीनच्या वुहानमधून उद्भवलेला हा विषाणू आता नवीन व्हेरिएंटमुळे अधिक धोकादायक आणि प्राणघातक बनला आहे. सध्याच्या घडीला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रोन आहे, जो जागतिक आरोग्य संघटनेने देखील चिंतेचा प्रकार मानला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 देशांमध्ये पसरलेल्या या नवीन व्हेरिएंटबाबत आतापर्यंत फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु WHOने संपूर्ण जगाला इशारा दिला आहे. 


Omicronबाबत WHOचा इशारा


लसीकरण हळू प्रमाणात होतंय शिवाय कोरोना चाचणी देखील खूप कमी होतेय असा संपूर्ण जगात कोरोना महामारीच्या संदर्भात ट्रेंड आहे. अशा परिस्थितीत, डब्ल्यूएचओच्या म्हणण्याप्रमाणे, हा ट्रेंड कोरोनाचे अनेक व्हेरिएंट्सना अधिक शक्तिशाली बनवतो आणि त्यांचा कोणत्याही देशात पसरण्याचा धोका देखील लक्षणीय वाढतो.


ओमायक्रोनपासून जगाला सुरक्षित कसं बनवायचं या प्रश्नावर डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, कोणीही नवीन काही करण्याची गरज नाही. कोरोनाची काही शस्त्रं आधीपासूनच आहेत, त्यांचा योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर करणं आवश्यक आहे.


तसे, काही देशांनी ओमायक्रोनचा धोका टाळण्यासाठी प्रवासी बंदीसारखं पावलं उचलली आहेत. पण WHO ते योग्य मानत नाही. WHOच्या मताप्रमाणे, हे निर्णय केवळ अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम करतात, व्हायरस ते थांबवू शकत नाहीत.


डेल्टा प्रकारांबाबत सावध राहण्याचा सल्ला


त्याच वेळी, WHOने देखील यावर जोर दिला आहे की, ओमायक्रोनमधील डेल्टा व्हेरिएंटचा धोका कमी आहे असं म्हणता येणार नाही.


हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, डेल्टा प्रकारामुळे जगात अजूनही सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत काही देशांनी ज्या प्रकारे डेल्टाचा प्रादुर्भाव कमी केला आहे, त्या रणनीतीचा ओमायक्रोनच्या बाबतीतही अवलंब करावा लागेल.