3 Days Workout : आताची तरूणाई आळशी झाली आहे, व्यायाम करायचा नाही बाहेरचं फास्ट फूड खायचं त्यामुळे कमी वयातच इतकं वजन वाढतं की चार चौघात त्यांनाच लाजल्यागत होतं. वेळेवर झोपणं नाही, रात्रभर मोबाईलवर वेळ घालवणे. काहींची इच्छा असते मात्र कामाच्या व्यापाने आणि इतर कामामुळे त्यांना स्वत:साठी वेळ देता येत नाही. मात्र दुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही फक्त 3 दिवस व्यायाम करूनही स्वतःला तंदरुस्त ठेवू शकता. (One week loss weight do 3 days exercise & you are very fit Health Marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्कआउटच्या पहिल्या दिवशी पुढील व्यायाम करा. हा व्यायाम करण्यासाठी, प्रथम 15 सेकंद जंप स्क्वॅट्स करा. त्यानंतर  20 ते 30 सेकंद फोरआर्म प्लैंक करा. हे सलग 3 वेळा पुन्हा करा. या व्यायामामध्ये तुम्ही 30 ते 45 सेकंद थांबू शकता.



दुसऱ्या दिवशी तुम्ही अॅडवान्स व्यायाम करू शकता. हा व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात. त्यानंतर तुम्ही स्क्वॅट्स करा. हा व्यायाम 8 वेळा करा. 



तिसऱ्या दिवशी तुम्ही कार्डिओ व्यायाम करू शकता. हा व्यायाम तुम्ही 10 ते 15 मिनिटे करू शकता. हा व्यायाम करण्यासाठी, आपण प्रथम एकाच ठिकाणी उभे राहणे आवश्यक आहे. यानंतर त्याच ठिकाणी उडी मारा किंवा तुम्ही जिने चढू शकता, दोरीने उडी मारू शकता आणि सायकल देखील करू शकता. याशिवाय पोहणे हा देखील एक प्रकारचा कार्डिओ आहे. 


तुम्ही आठवड्यातून 3 दिवस जरी हे व्यायाम केले तरी तुमचं वाढलेलं फॅट आणि वजन हे लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी एकदा हा प्रयोग करून पाहाच. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.