Oral sex causes oral cancer: सध्या आपण पाहतोय कॅन्सरचं (cancer causes) प्रमाण प्रचंड वाढत चाललं आहे. यामागे बरीच कारणं आहेत. आपली बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी,कामाचे ताण तणाव अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत. अभ्यासातून अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. त्यापैकीच माऊथ कॅन्सर (mouth cancer causes) म्हणजे तोंडाचा कॅन्सर होण्यामागची काही कारणं समोर आली आहेत. त्यापैकी महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे  (oral sex causes cancer) ओरल सेक्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शारीरिक संबंध प्रस्थापित करताना ओरल सेक्स केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? ओरल सेक्स करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. काही हॉस्पिटल्समधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार मुख मैथुन (ORAL SEX) म्हणजेच ओरल सेक्स करणाऱ्यांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे.   


सुरवातीला धूम्रपान (smoking is injurious to health it causes cancer) तंबाखू आणि गुटख्याचं व्यसन हे तोंडाच्या कॅन्सरचं प्रमुख कारण मानलं जात होतं. मात्र, नवीन संशोधनानंतर जे कारण समोर आलं आहे, त्यानंतर अनेक एक्सपर्ट्स डॉक्टर्सना देखील धक्का बसला आहे. येत्या काळात मुख मैथुनमुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण सर्वात जास्त वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


ओरल कॅन्सरमुळे त्रस्त असणाऱ्या रुग्णांमध्ये पाहिलं तर, बहुतांश रुग्ण ही 20 ते 35 वर्षे वयोगटातील आहेत. याचा अर्थ तरुणांमध्ये ओरल कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 


संशोधनानुसार, ओरल सेक्समुळे एचपीवी (HPV) (ह्यूमन पेपिलोमा वायरस) हा व्हायरस निर्माण होतो आणि हाच व्हायरस तोंडाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत आहे. HPV व्हायरसमुळे महिलांमध्ये सवाईकल (cervical cancer) आणि अ‍ॅनल कॅन्सरचं (anal cancer) प्रमाणसुद्धा वाढलं आहे. कॅन्सर एक्सपर्ट्सनुसार, सध्या तरी हा आकडा कमी आहे पण यात वाढ व्हायला वेळ लागणार नाही. 


HPV एचपीवी म्हणजे काय ?


एचपीवी म्हणजे ह्युमन पेपीलोमा व्हायरस. शारीरिक संबधांदरम्यान एचपीवी शरीरात संक्रमण करतो. ज्यामुळे कॅन्सरच्या जिवाणूंची शरीरात वाढ होऊ लागते.  जर एखादा पार्टनर आधीच एचपीवीने ग्रस्त असेल तर दुसऱ्या पार्टनरला यौन संबंधानंतर या कॅन्सरचं संक्रमण खूप लवकर होण्याची शक्यता 100 टक्क्यांनी वाढते.  हे संक्रमण योनी सेक्स, ओरल सेक्स, गुद्दद्वार सेक्समार्फत पसरलं जातं. 


एचपीवी संक्रमण झाल्यानंतर त्याची लक्षणं लवकर दिसत नाहीत. लक्षणं दिसण्यासाठी एक आठवडा ते एक वर्षभर इतका काळ जातो. काही केसेसमध्ये तर लक्षणं कधीच दिसून येत नाहीत. 


 एचपीवी संक्रमणापासून बचावासाठी काय करावे 


  • शक्य असल्यास ओरल सेक्स करू नये (Avoid oral sex)

  • तुम्ही कंडोमचा वापर करू शकता (condom)

  • सध्या दिवसातून 5-6 केसेस समोर येत आहेत ज्यांना ओरल सेक्समुळे कॅन्सरची लक्षणं दिसू लागली आहेत. त्यामुळे वेळीच सतर्क व्हा आणि कोणतीही लक्षणं दिसली तरी संकोच न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि शक्य तितक्या प्रमाणात जागरुक राहा आणि स्वतःला कॅन्सर होण्यापासून रोखा.