Diabetes Patient India News in Marathi: सध्याच्या काळात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे आजकालच्या धावपळीच्या जगात ताणतणाव, खाण्या-पिण्यातील बदल अशा विविध कारणांमुळे लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण भरपूर वाढले आहे. म्हणूनच मधुमेहाचे रुग्ण आहाराचे पालन, व्यायाम करून, वेळोवेळी औषधे घेऊन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांनी वेळीच काही गोष्टी केल्या नाहीत तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढून इतर अनेक आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे जेणेकरून त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागणार नाही. अशातच आता मधुमेहच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने ब्रिटनच्या लॅन्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नल्समध्ये मधुमेह रुग्णांची आकडेवारी प्रकाशित केली आहे. यामध्ये गोवा, पुदुच्चेरी आणि केरळ या राज्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात एका मधुमेही रुग्णामागे 4 प्री-डायबेटिक केसेस आहेत, अशी माहिती लॅन्सेटमध्येही देण्यात आली आहे. लठ्ठपणा, संथ जीवनशैली आणि मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास ही मधुमेहाची तीन प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. 


वाचा: शरीराच्या 'या' भागांमध्ये वेदना होऊ लागल्या; तर समजा कोलेस्ट्रॉल वाढले, जाणून घ्या लक्षणे 


दरम्यान यूके मेडिकल जर्नल 'लॅन्सेट' मध्ये प्रकाशित झालेल्या ICMR च्या अहवालानुसार, भारतात मधुमेही रुग्णांची संख्या 101 दशलक्ष आहे, म्हणजेच 10.1 कोटींहून अधिक असल्याची माहिती आहे. हिच रुग्णसंख्या 2019 मध्ये हे 70 लाख म्हणजे 7 कोटी होती. तर काही विकसित राज्यांमध्ये केवळ संख्या स्थिर आहे, परंतु इतर अनेक राज्यांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, किमान 136 दशलक्ष (13.6 कोटी) लोक, म्हणजेच 15.3 टक्के लोकसंख्या प्री डायबेटिक रुग्ण दिसून आले आहेत. 


ICMR ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गोवा (26.4 टक्के), पुद्दुचेरी (26.3 टक्के) आणि केरळ (25.5 टक्के) मध्ये मधुमेहाचे सर्वाधिक प्रमाण आढळून आले. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या कमी प्रसार असलेल्या राज्यांमध्ये पुढील काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याची माहीती ICMR च्या अहवालातून समोर आली आहे.